शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

देवगड पवनचक्की येथील दोन स्टॉलधारकांमध्ये हाणामारी, दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: May 11, 2024 18:19 IST

देवगड पोलिस ठाण्यामध्ये परस्परविरोधी तक्रारी 

अयोध्याप्रसाद गावकरदेवगड : देवगड पवनचक्की येथील दोन स्टॉलधारकांमध्ये हाणामारी झाली. याप्रकरणी देवगड पोलिस ठाण्यामध्ये परस्परविरोधी दिलेल्या तक्रारीवरून दहा जणांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही घटना शुक्रवारी सायंकाळी ५:४५ वाजण्याच्या सुमारास घडली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कीर्ती कृष्णा घाडी (२५, सध्या राहणार पवनचक्की देवगड मूळ राहणार डोंबिवली मुंबई) हिने दिलेल्या तक्रारीमध्ये शुक्रवार १० मे रोजी सायंकाळी पावणे सहाच्या सुमारास पवनचक्की येथील सत्यवान जोईल यांच्या मालकीच्या वडापावच्या स्टॉलवर नाश्त्याचे पदार्थ बनवित होता. या स्टॉलच्या शेजारी बाजूस असलेल्या पाणीपुरी स्टॉलधारक शैलेश भुजबळ याने माझा आते भाऊ सनीत सत्यवान जोईल यास बोलावून घेऊन ‘तू लय शहाणा झालायस काय’ असे विचारून त्याला मारण्यास सुरुवात केली.

त्यावेळी त्या मारहाणीचे शूटिंग करत असताना सुप्रिया भुजबळ व शीतल जोईल यांनी माझ्या अंगावर धाव घेऊन मला मारण्यास सुरुवात केली. तसेच शैलेश भुजबळ याने सनीत यास लाथा बुक्क्याने मारहाण केली. त्याचबरोबर शैलेश भुजबळ याच्यासमवेत असलेले मंजी काका व हेमंत जोईल यांनी माझी आत्या स्मिता सत्यवान जोईल, काका सत्यवान वसंत जोईल व आत्ते भाऊ सनीत जोईल यांना शिवीगाळ करून हाताने मारहाण करून ठार मारण्याची धमकी दिली. या तक्रारीवरून देवगड पोलिसांनी सुप्रिया भुजबळ, शीतल जोईल, शैलेश भुजबळ, मंजी काका, हेमंत जोईल या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.तर ईश्वरी शैलेश भुजबळ हिने दिलेल्या तक्रारीमध्ये १० मे रोजी सायंकाळी पावणे सहा वाजता आपल्या पाणीपुरीच्या स्टॉलवर असलेले सासरे मंजिनाथ वसंत भुजबळ यांना सनीत सत्यवान जाईल यांनी शिवीगाळ केली. याबाबत विचारणा करायला गेल्यावर त्याने मलाही शिवीगाळ केली. यावेळी आपले पती शैलेश भुजबळ हे आले असता त्यांनाही शिवीगाळ करून सनीत सत्यवान जोईल, सत्यवान वसंत जोईल, रज्जा अंकुश चव्हाण या तिघांनी मारहाण करून दुखापत केली. त्याचबरोबर कीर्ती कृष्णा घाडी व स्मिता सत्यवान जोईल यांनीही शिवीगाळ करून ठार मारण्याची धमकी दिली.या तक्रारीवरून देवगड पोलिसांनी सनीत सत्यवान जाईल, सत्यवान वसंत जोईन, कीर्ती कृष्णा घाडी, स्मिता सत्यवान जोईल व रज्जा अंकुश चव्हाण या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल उदय शिरगावकर करत आहेत.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गDevgad Police Stationदेवगड पोलिस स्टेशनCrime Newsगुन्हेगारी