सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी सिटी स्कॅन मशीन

By Admin | Updated: March 27, 2017 16:07 IST2017-03-27T16:07:08+5:302017-03-27T16:07:08+5:30

दीपक केसरकर यांची माहिती : १६ मशीन्स मिळणार

City Scan Machine for Sindhudurg District | सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी सिटी स्कॅन मशीन

सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी सिटी स्कॅन मशीन




आॅनलाईन लोकमत

सिंधुदुर्गनगरी : सर्व जिल्ह्यांतील शासकीय रुग्णालयांना सिटीस्कॅन मशीन देण्याची तरतूद आहे, त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यालाही हे मशीन देण्यात येईल, अशी घोषणा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सोमवारी केली.
जिल्हा रुग्णालयातील सिटीस्कॅन मशीन बंद आहेत, याकडे माजी आमदार प्रमोद जठार यांनी लक्ष वेधले. यावेळी सर्व जिल्हा रुग्णालयातील सिटी स्कॅन मशीन सध्या नादुरुस्त असल्याचे पालकमंत्र्यांनी मान्य केले. परंतु जिल्ह्या रुग्णालयाला प्राधान्याने हे मशीन देण्यात येईल, असेही केसरकर यांनी सांगितले.
सिध्दिविनायक ट्रस्टमार्फत लवकरच जिल्ह्याला १६ सिटीस्कॅन मशीन देण्यात येणार असल्याची माहिती यावेळी जिल्हा शल्य चिकित्सकांनी दिली.

Web Title: City Scan Machine for Sindhudurg District