शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कुडाळच्या नगराध्यक्षांची दुचाकी चोरली; दोघे ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2019 16:05 IST

कुडाळ नगराध्यक्षांच्या दुचाकीसह अन्य दोन दुचाकी चोरीप्रकरणी कुडाळ पोलिसांनी राजापूर पोलीस ठाण्यात अटक असलेले जयप्रकाश चिंदरकर (२६, रा. नागवे), विशाल नाईक (३०, रा. तळेरे) या दोघा संशयितांना कुडाळ पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

ठळक मुद्देकुडाळच्या नगराध्यक्षांची दुचाकी चोरली; दोघे ताब्यातकुडाळ पोलिसांची कारवाई : राजापूर येथे होते अटकेत

कुडाळ : कुडाळ नगराध्यक्षांच्या दुचाकीसह अन्य दोन दुचाकी चोरीप्रकरणी कुडाळ पोलिसांनी राजापूर पोलीस ठाण्यात अटक असलेले जयप्रकाश चिंदरकर (२६, रा. नागवे), विशाल नाईक (३०, रा. तळेरे) या दोघा संशयितांना कुडाळ पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.१८ जुलै रोजी रात्री कुडाळचे नगराध्यक्ष ओंकार तेली यांची त्यांच्या दुकानासमोर लावलेली दुचाकी चोरीला गेल्याचे समजताच तेली यांनी याबाबत कुडाळ पोलीस स्थानकात तक्रार दिली होती. या प्रकरणाचा कुडाळ पोलीस तपास करीत असतानाच कुडाळ द्वारका पार्क येथे राहणारे सुधीर म्हाडदळकर यांची दुचाकी व कसाल येथील कदम यांची दुचाकी कसाल येथून गुरुवारी रात्री चोरीला गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. एकाच रात्री तीन दुचाकी चोरीला गेल्याचे समजताच पोलीस प्रशासनाने तत्काळ या प्रकरणाची माहिती वायरलेस यंत्रणेद्वारे सर्व पोलीस ठाण्याना कळविली.दरम्यान, शुक्रवारी पहाटे तपासणी करताना राजापूर पोलिसांनी सिंधुदुर्गहून रत्नागिरीच्या दिशेने दुचाकीवरून जाणाऱ्या चौघांना थांबवून अधिक चौकशी करीत त्यांच्याकडे गाडीच्या कागदपत्रांची मागणी केली असता ते समर्पक उत्तरे देऊ शकले नाहीत. त्यामुळे राजापूर पोलिसांना त्या चौघांचाही संशय आला व त्यांनी त्या चौघांना अधिक चौकशीसाठी ताब्यात घेतले असता कुडाळ येथून दुचाकी चोरल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांना राजापूर पोलिसांनी अटक केली होती.कुडाळ पोलीस ठाण्यात या दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल असल्याने कुडाळ पोलिसांनी या जयप्रकाश व विशाल या दोन संशयितांना राजापूर पोलीस ठाण्यातून ताब्यात घेत बुधवारी रात्री कुडाळ येथे आणले. या दोघांनाही न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने या दोघांनाही दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. या चोरलेल्या दुचाकी कुठे नेल्या जात होत्या. त्या दुचाकींचे ते काय करणार होते. यामागे नेमके कोणाचे कनेक्शन आहे याचा तसेच या अगोदर जिल्ह्यातील इतर काही ठिकाणच्या दुचाकी चोरीमध्येही या संशयितांचा हात आहे का याचाही तपास करण्यात येणार असल्याची माहिती कुडाळ पोलिसांनी दिली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूर