‘25 आमदार तरी निवडून आणा’

By Admin | Updated: October 2, 2014 01:38 IST2014-10-02T01:38:23+5:302014-10-02T01:38:23+5:30

शिवसेनाप्रमुखांनी सर्वाना स्वाभिमान शिकवला. पण उद्धव ठाकरे लाचारी शिकवत आहेत. मुख्यमंत्रीपदाचे बाशिंग बांधता, पण 25 आमदार तरी निवडून आणून दाखवा,

'Choose 25 MLAs' | ‘25 आमदार तरी निवडून आणा’

‘25 आमदार तरी निवडून आणा’

सावंतवाडी : शिवसेनाप्रमुखांनी सर्वाना स्वाभिमान शिकवला. पण उद्धव ठाकरे लाचारी शिकवत आहेत. मुख्यमंत्रीपदाचे बाशिंग बांधता, पण 25 आमदार तरी निवडून आणून दाखवा, असे आवाहन माजी उद्योगमंत्री नारायण राणो यांनी बुधवारी उद्धव ठाकरे यांना दिले. भाजपाचे सर्वचजण मुख्यमंत्री होण्यास उत्सुक आहेत. पण ते त्यांचे काम नाही. पंतप्रधान मोदींच्या नावावर मते मागता, सरकार कोण चालविणार, मोदी की तुम्ही असा सवाल करत राणोंनी भाजपावरही जोरदार हल्ला चढविला.
सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात काँग्रेस उमेदवार बाळा गावडे यांच्या प्रचाराचा शुभारंभ राणो यांच्या हस्ते येथील बॅ. नाथ पै सभागृहात झाला. राणो म्हणाले, काँग्रेसवगळता कोणत्याही  पक्षाकडे निष्ठा असलेला उमेदवार नाही. भाजपाकडून तर खून, फसवणूक केलेला असा उमेदवार उभा राहिला असून, राष्ट्रीय पक्ष म्हणून मिरवणा:या भाजपाची नीतीमत्ता गेली कुठे, असा त्यांनी केला.  (प्रतिनिधी)

 

Web Title: 'Choose 25 MLAs'