बालकलाकारांनी रसिकांना नाचवल
By Admin | Updated: December 27, 2014 00:00 IST2014-12-26T21:49:51+5:302014-12-27T00:00:40+5:30
दुसरा दिवस : सावंतवाडी येथील पर्यटन महोत्सव; रंगमंच टाळ्या, शिट्यांनी दणाणले

बालकलाकारांनी रसिकांना नाचवल
सावंतवाडी : सावंतवाडी पर्यटन महोत्सवाचा दुसरा दिवस गाजवला तो सावंतवाडीतील बालचमुंनी. या बालकलाकरांना रसिकांनी डोक्यावर घेतले. अनेक चित्रपटातील गाणी आपल्या अदांनी स्थानिक युवकांनी गात त्यावर डान्सही केला. यामुळे प्रत्येक रसिकांकडून टाळ््यांची आणि शिट्यांची दाद ऐकायला मिळत होती.
या बालकरांना एकत्रित आणले, ते सद्गुरू संगीत विद्यालयाच्या निलेश मेस्त्री यांचे नगरपालिकेच्यावतीने स्वागत करण्यात आले.
दुनियादारीमधील टिक टिक वाजते, हे गाणे असो किंवा एखादी लावणी असो, त्याला आपल्या ढंगात प्रदर्शित करणाऱ्या या बालचमुने गुरूवारी पर्यटन महोत्सवातील रसिकांना तोंडावर बोट घेण्यास लावले याला कारण ही तसेच आहे. लहान मुले आपली कला कशी सादर करतात, त्यांच्या या कले बाबत येथील रसिक आश्चर्यचकित झाला. त्यांना उत्कृ ष्ट दाद मिळाली ती निवेदक राजा सामंत यांची. त्यांनी तर या बालकलाकारांना निवेदनातून रसिकांपर्यंत नेऊन सोडले. कार्यक्रमाची सुरूवात देवावर आधारित गाण्याने करतानाच शेवटही तसाच केला. माऊली माऊली या गाण्यावर पालखी, बालाजी, तसेच झांज पथक, शिवाजी महाराजांच्या काळातील पेशवाई आदी या रंगमचावर अवतरले होते.
या बालकलाकारांना खऱ्या अर्थाने साथ मिळाली ती निलेश मेस्त्री यांची तर ढोलकी वर किशोर सावंत, सिध्देश सावंत आदींनी उत्कृष्ट साथ दिली यामुळे या कार्यक्रमात आणखी रंगत आली. या बालकलाकरांचे स्वागत माजी नगराध्यक्षा पल्लवी केसरकर यांनी केले. यावेळी नगराध्यक्ष बबन साळगावकर, राजन पोकळे, विलास जाधव, संजय पेडणेकर, किर्ती बोंद्रे, शर्वरी धारगळकर, अफरोझ राजगुरू आदी उपस्थित होते. स्थानिक कलाकारांना यापूर्वी एवढ्या मोठ्या प्रमाणात कधीही साथ मिळाली नव्हती. प्रथमच सावंतवाडी पर्यटन महोत्सवात स्थानिक कलाकरांनी कला सादर केली या कलेला रसिकांनी चांगली साथ दिल्यामुळे अनेकांनी आभार मानले आहेत. (प्रतिनिधी)
कलामंचला दाद
बालचमूंच्या कार्यक्रमापूर्वी सावंतवाडीतील ओंकार कलामंचाच्या कलाकारांनीही आपल्या विविध कला सादर केल्या. त्यांच्याही कलेला उत्स्फूर्तपणे दाद दिली. ओंकार कलामंचांच्या कलाकारांनी मिनी पर्यटना कार्यक्रमामधील विजेते ठरल्यामुळे त्यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.