वर्षात दोनवेळा चिक्की वाटप
By Admin | Updated: July 2, 2015 23:25 IST2015-07-02T23:25:57+5:302015-07-02T23:25:57+5:30
विविध प्रश्नांवर चर्चा : वेंगुर्ले पंचायत समिती सभेत उमटले पडसाद

वर्षात दोनवेळा चिक्की वाटप
सावंतवाडी : स्वर्गीय जवाहरलालजी दर्डा यांनी महाराष्ट्रात लावलेल्या ‘लोकमत’ च्या रोपट्याचे आता वटवृक्षात रूपांतर झाले आहे. सामाजिक, शैक्षणिक, शेती विषयक सर्व प्रश्नांना न्याय देऊन ‘लोकमत’ घराघरात पोहोचला आहे. राज्यात सर्वत्र सध्या अपुरा रक्तपुरवठा आहे. रक्ताची गरज ओळखून जवाहरलालजी दर्डा यांच्या पुण्यस्मरणानिमित्त आज सावंतवाडीत घेतलेल्या रक्तदान शिबिराचा उपक्रम कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन सावंतवाडीचे नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी बोलताना केले.
दरम्यान, ‘लोकमत’ने राज्यभर व गोवा राज्यात गुरुवारी घेतलेल्या शिबिरात एकूण १२५४ जणांनी रक्तदान केले.
स्वातंत्र्य संग्राम सेनानी श्रद्धेय जवाहरलालजी दर्डा यांच्या पुण्यस्मरणानिमित्त येथील बॅ. नाथ पै सभागृहात भव्य रक्तदान शिबिर गुरूवारी पार पडले. या शिबिराचे उद्घाटन बबन साळगावकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना साळगावकर बोलत होते.यावेळी सावंतवाडीचे पोलीस निरीक्षक रणजीत देसाई, सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र शेलार, उपनिरीक्षक कळेकर, वैद्यकीय अधीक्षक उत्तम पाटील, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संजू परब, मंगेश तळवणेकर, ‘लोकमत’चे आवृत्तीप्रमुख महेश सरनाईक, नगरसेवक देवेंद्र टेमकर, नगरसेविका शर्वरी धारगळकर, साक्षी कुडतरकर, शुभांगी सुकी, क्षिप्रा सावंत, अफरोज राजगुरू, कोकण मराठी साहित्य परिषदेचे भरत गावडे आणि ‘लोकमत’ परिवारातील सदस्य उपस्थित होते. सावंतवाडी उपजिल्हा रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. उत्तम पाटील यांनी ‘लोकमत’च्या उपक्रमाचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या.भाजपाचे प्रदेश सरचिटणीस माजी आमदार राजन तेली यांनी शिबिराला भेट देऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी माजी नगरसेवक आनंद नेवगी आदी उपस्थित होते. (वार्ताहर)
राजकारण्यांना दिशा देण्याचे काम : साळगावकर
‘लोकमत’ या दैनिकाने कोकणात स्थापनेनंतर गेल्या आठ वर्षात अनेक प्रश्नांना वाचा फोडली. कोकणच्या विकासप्रक्रियेत या दैनिकाचा मोठा वाटा आहे. तळागाळातील समस्या जाणून घेऊन त्यांना व्यासपीठ देण्याचा कायमच ‘लोकमत’ने प्रयत्न केला आहे. तसेच राज्यात अनेक प्रश्न सोडवून राजकारण्यांना दिशा देण्याचे काम ‘लोकमत’ करीत आहे. तसेच सामाजिक सलोख्याच्या भावनेतून ‘लोकमत’ कायमच उपक्रम राबवित आहे. त्यामुळेच ते लोकप्रिय दैनिक बनले आहे, असे गौरवोद्गारही बबन साळगावकर यांनी यावेळी काढले.
रक्तसाठा करणे गरजेचे : रणजीत देसाई
दररोज रूग्णांना रक्ताची उणिव भासत असते. मात्र, रक्ताचा साठाच उपलब्ध नसतो. याची दखल घेत ‘लोकमत’ने रक्तदान शिबिराचा घेतलेला उपक्रम वाखाणण्याजोगा आहे. सध्या निगेटिव्ह रक्ताचा साठा अत्यंत अल्प प्रमाणात आढळून येतो. या निगेटिव्ह रक्ताची गरज रूग्णांना जास्त प्रमाणात भासते. यामुळे निगेटिव्ह रक्ताकडे लक्ष ठेवत जास्तीत जास्त रक्तसाठा करणे गरजेचे आहे, असे मत सावंतवाडीचे पोलीस निरीक्षक रणजीत देसाई यांनी बोलताना व्यक्त केले.
१६ जणांनी केले रक्तदान
सावंतवाडी येथे ‘लोकमत’ ने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात पोलीस कर्मचारी, महाविद्यालयीन विद्यार्थी, स्थानिक नागरिक मिळून १६ जणांनी रक्तदान केले. हे शिबिर यशस्वी होण्यासाठी सावंतवाडी नगरपालिकेचे सहकार्य लाभले.