शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात केमोथेरपी केंद्र सुरू होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2018 16:33 IST

कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात केमोथेरपी केंद्र सुरू करण्याच्या भाजपचे आमदार अ‍ॅड. निरंजन डावखरे यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. या निर्णयामुळे सिंधुदुर्गातील रुग्णांबरोबरच नातेवाईकांची फरफट टळण्यास मदत होणार आहे.

ठळक मुद्देरत्नागिरी जिल्हा रुग्णालयात केमोथेरपी केंद्र सुरू होणारआमदार अ‍ॅड. निरंजन डावखरे यांच्या प्रयत्नांना यश

सिंधुदुर्ग : कोकणातील एका जिल्ह्यात केमोथेरपी केंद्र सुरू करण्याच्या भाजपचे आमदार अ‍ॅड. निरंजन डावखरे यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. या निर्णयामुळे सिंधुदुर्गातील रुग्णांबरोबरच नातेवाईकांची फरफट टळण्यास मदत होणार आहे.कोकणातील रत्नागिरी जिल्हा रुग्णालयाबरोबरच राज्यातील 11 जिल्हा रुग्णालयात केमोथेरपी केंद्र लवकरच सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.राज्य सरकारने पहिल्या टप्प्यात राज्यातील दहा जिल्हा रुग्णालयात केमोथेरपी केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, त्यात कोकणातील एकाही जिल्ह्याचा समावेश करण्यात आला नव्हता. त्यामुळे कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार अ‍ॅड. निरंजन डावखरे यांनी आरोग्य मंत्री दिपक सावंत यांची 2 मे रोजी तातडीने भेट घेऊन लक्ष वेधले होते.

तसेच कोकणात केंद्र सुरू करण्याचा आग्रह धरला होता. त्यावेळी आरोग्यमंत्र्यांनी सिंधुदुर्गात केंद्र सुरू करण्यासाठी तांत्रिक अडचणी दूर केल्या जात असल्याचे स्पष्ट केले होते. मात्र, त्या अडचणी दूर न झाल्यामुळे अखेर रत्नागिरीत केंद्र सुरू केले जाणार आहे.रत्नागिरीबरोबरच राज्यातील 11 ठिकाणी टाटा मेमोरियल हॉस्पीटलच्या सहकार्याने केमोथेरपी केंद्र सुरू करण्यात येणार आहेत. भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी सोमवारी विधानसभेत विचारलेल्या तारांकित प्रश्नात ही माहिती देण्यात आली.कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगडमधील जिल्हा रुग्णालयात केमोथेरपी केंद्र नसल्यामुळे कर्करोग रुग्णांना केमोथेरपीच्या उपचारासाठी मुंबईला जावे लागते. मुंबईतील टाटा रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांबरोबरच नातेवाईकांचेही अतोनात हाल होतात. त्यात त्यांचा बराच वेळ व पैसाही नाहक खर्च होतो.

ठाणे व पालघर जिल्ह्यातील रुग्ण साधारणतः चार तासांत मुंबईला पोचू शकतात. मात्र, कोकणातील रुग्णांना किमान सहा ते 13 तासांचा प्रवास करावा लागतो. त्यामुळे कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यातील रुग्णांच्या सोयीच्या दृष्टीने पहिल्या टप्प्यात कोकणातील एका जिल्हा रुग्णालयात केमोथेरपी केंद्र सुरू करावे, अशी आग्रही मागणी आमदार डावखरे यांनी केली होती.

टॅग्स :Healthआरोग्यNiranjan Davkhareनिरंजन डावखरेsindhudurgसिंधुदुर्गRatnagiriरत्नागिरी