‘त्या’ उद्यानातील वस्तू बदला
By Admin | Updated: August 17, 2014 22:32 IST2014-08-17T21:33:00+5:302014-08-17T22:32:15+5:30
नारायण राणे यांचे आदेश : सिंधुदुर्गनगरीतील टाऊन पार्कचा शुभारंभ

‘त्या’ उद्यानातील वस्तू बदला
सिंधुदुर्गनगरी : पर्यटनाच्यादृष्टीने महत्त्वाची सुविधा देणाऱ्या टाऊन पार्क आणि दाबाचीवाडी येथील उद्यान या दोन प्रकल्पांचे पालकमंत्री नारायण राणे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. मात्र दाबाचीवाडी येथील उद्यानाच्या कामाबाबत राणे यांनी तीव्र नाराजी व्यक्त करीत उद्यानातील वस्तू बदलण्याचे आदेश दिले आहेत.
दरम्यान, टाऊन पार्क १ कोटी ८६ लाख व सिंधुदुर्गनगरी बोटींग जेटी व उद्यानावरील विकासासाठी ४ कोटी ७२ लाख मिळून ६ कोटी ५८ लाखांचे काम पूर्णत्वाकडे गेले आहे. सिंधुदुर्गनगरीतील टाऊन पार्क आणि दाबाचीवाडी तलावातील बोटींग, जेटी आणि उद्यान प्रकल्पाचे उद्घाटन पालकमंत्री नारायण राणे यांच्या हस्ते शनिवारी दुपारी झाले.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा दीपलक्ष्मी पडते, जिल्हाधिकारी ई. रविंद्रन, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पांढरपट्टे, कोकण सिंचन महामंडळाचे उपाध्यक्ष संदेश पारकर, काँग्रेसचे युवा नेते नीतेश राणे, अप्पर जिल्हाधिकारी किशोर तावडे, निवासी उपजिल्हाधिकारी ज्ञानेश्वर खुटवड, उपविभागीय अधिकारी रवींद्र बोबले, पत्तनचे कार्यकारी अभियंता श्रीकांत डेघडे, सार्वजनिक बांधकाम कार्यकारी अभियंता छाया नाईक, दाबाचीवाडी सरपंच मळवे, उपसरपंच तेजल पाटकर, पंचायत समिती सदस्य परशुराम परब, अवधूत मालवणकर, उदय जांभवडेकर, भाई सावंत, राजन परब, पोलीस पाटील सुनील पाटकर आदी उपस्थित होते.
या दोन्ही प्रकल्पांचे उद्घाटन राणे यांच्या हस्ते झाले. त्यानंतर सर्व कामांची फिरून पाहणी केली. सुरूवातीला उद्यानाची पाहणी करताना राणे म्हणाले, मुलांसाठी उभारण्यात आलेले झोपाळे, घसरगुंडी, बसण्यासाठी बाक, शोची झाडे या वस्तू टिकावू नसून त्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. एक ना अनेक त्रुटी काढत गार्डन आहे की जंगल? असा सवालही यावेळी कार्यकारी अभियंता श्रीकांत डेघडे यांना उपस्थित केला. त्रुटी सांगितलेल्या वस्तू तत्काळ बदला, असे आदेश राणे यांनी
दिले. (प्रतिनिधी)