मध्यप्रदेशात असण्याची शक्यता : कार्इंगडे
By Admin | Updated: July 28, 2015 00:28 IST2015-07-27T22:49:26+5:302015-07-28T00:28:35+5:30
राज्यातील तीन जिल्ह्यांमध्ये या चोरट्यांचा शोध घेण्यासाठी जाणार

मध्यप्रदेशात असण्याची शक्यता : कार्इंगडे
सिंधुदुर्गातील घरफोडी प्रकरणातील एका टोळीला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे. सुत्रांच्या माहितीनुसार व तपासाअंती या चोऱ्यांमध्ये दुसरी टोळीही सक्रीय होती. मात्र ती निसटून गेल्याची शक्यता आहे. त्या टोळीचा शोध घेण्यात येत असून ती टोळीदेखील मध्यप्रदेश येथील असण्याची शक्यता आहे अशी माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक विश्वजित कार्इंगडे यांनी दिली.सिंधुदुर्गातील चोऱ्यांमध्ये आणखीन एका आंतरराज्य टोळीचा सहभाग असल्ल्याची शक्यता बाळगून त्यादृष्टीने त्याचा शोध घेण्यात येत आहे. मध्यप्रदेश येथील काही सूत्रांकडून या चोरट्यांचा माग घेण्यात येत आहे. या चोरट्यांचा शोध घेण्यासाठी एल. सी. बी. विभागाचे एक पथक येत्या ८ दिवसांत मध्यप्रदेशला रवाना होणार आहे. हे पथक मध्यप्रदेश राज्यातील तीन जिल्ह्यांमध्ये या चोरट्यांचा शोध घेण्यासाठी जाणार आहे अशी माहिती यावेळी देण्यात आली.