चक्रव्यूह जागवितो महाभारत
By Admin | Updated: July 28, 2015 00:25 IST2015-07-27T22:03:11+5:302015-07-28T00:25:33+5:30
वाळूत रेखाटन : गुहागर किनारी शर्मा दाम्पत्याकडून उजाळा

चक्रव्यूह जागवितो महाभारत
शृंगारतळी : अभिमन्यू चक्रव्युहात अडकला आणि जयंद्रथाने त्याचा अंत केला. अर्जुनपुत्र अभिमन्यूने पराक्रम केला. चक्रव्यूह भेदण्याचे ज्ञान व एकंदर या ज्ञानाबाबत साऱ्यानाच उत्सुकता राहिली आहे. महाभारताचा हा दाखला देत गुहागर समुद्रकिनारी पुळणीवर दिल्ली येथील प्राध्यापक ओमप्रकाश शर्मा यांनी वाळूत हे दृश्य साकारले. या भागात येणाऱ्या पर्यटकांसाठी हा अभ्यासाचा, कौतुकाचा विषय ठरला. गुहागर किनारी एक मुलगा पुळणीवर काडीने वेगवेगळी चित्र काढत असताना त्या ठिकाणी दाभोळ येथील रत्नागिरी गॅस आणि पॉवर लिमिटेड वीज प्रकल्पात उपव्यवस्थापक असणारे अमित शर्मा आपल्या आई वडिलांसोबत समुद्रकिनारी भंटकती करीत आले. समुद्रकिनारी फिरताना त्या मुलाला पाहून ओमप्रकाश शर्मा यांच्यातील शिक्षक जागा झाला. त्यांनी मुलाच्या हातातील काडी घेत महाभारतातील चकव्युहाचा नकाशा गिरवत त्या मुलाला माहिती दिली़
सात दरवाजांच्या युध्दकलेत निष्णात असणाऱ्या अभिमन्यूने सहा दरवाजे सहज भेदले. सुभद्रेच्या पोटात असताना अर्जुनाच्या तोंडून चक्रव्यूह भेदण्याचे रहस्य जाणले होते. मात्र, अर्ध्यात सुभद्रेला झोप लागल्याने चकव्युहामधून बाहेर कसे पडायचे, या ज्ञानापासून अभिमन्यू वंचित राहिला. अभिमन्यूला जयंद्रथाने कपटाने मारले. त्याची कथा ओमप्रकाश शर्मा यांनी त्या मुलाला सांगितली़ अनोळखी व्यक्ती शिक्षक बनल्याने त्या मुलाला मात्र कौतुक वाटत होते़ (वार्ताहर)