सभापती बदलले; ‘नेमप्लेट’ अजून त्याच

By Admin | Updated: December 29, 2014 23:42 IST2014-12-29T21:56:21+5:302014-12-29T23:42:49+5:30

सुस्त कारभार : पालिका प्रशासनाची फलक बदलण्याकडे डोळेझाक

Chairman changed; The nameplate is still the same | सभापती बदलले; ‘नेमप्लेट’ अजून त्याच

सभापती बदलले; ‘नेमप्लेट’ अजून त्याच

चिपळूण : येथील नगरपरिषद विविध विषय समिती सभापती निवडणूक कार्यक्रम दोन दिवसांपूर्वी झाला. सभापती ही बदलते. परंतु दरवाजावर असणाऱ्या नेमप्लेट जुन्याच नावाच्या असल्याचे चित्र आज (सोमवारी) पाहावयास मिळाले. त्यामुळे नागरिकांमध्येही उलटसुलट चर्चा केली जात आहे.
चिपळूण नगर पालिकेतील पाणी पुरवठा आरोग्य व वैद्यकीय समिती, बांधकाम, शिक्षण, महिला व बालकल्याण समिती तसेच स्थायी समितीच्या सभापतीपदाची निवडणूक शुक्रवारी बिनविरोध झाली. शिक्षण समितीच्या सभापतीपदी निर्मला चिंगळे व बांधकाम समितीच्या सभापतीपदी पुन्हा बरकत वांगडे यांना संधी देण्यात आली आहे. आरोग्य व वैद्यकीय समितीच्या सभापतीपदी रुक्सार अलवी, महिला बालकल्याण समितीच्या सभापतीपदी शिल्पा खापरे, पाणीपुरवठा समितीच्या सभापतीपदी उपनगराध्यक्ष लियाकत शाह, स्थायी समितीच्या सभापतीपदी कबीर काद्री यांची बिनविरोध निवड झाली आहे.
सभापतींसाठी स्वतंत्र केबीन असून, या केबीनमधील नावांमध्ये बदल करण्यात आला आहे. मात्र, दरवाजावर असणाऱ्या फलकावर जुनीच नावे असल्याचे चित्र आज दुपारपर्यंत पाहावयास मिळाले. सभापती बदलले. मात्र, दरवाजावरील नावे जुनीच असल्याने सभापतींना भेटण्यास आलेल्या नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला.
संबंधित यंत्रणेने केबीनच्या दरवाजावरील जुन्या नावांचा फलक काढण्याबाबत वेळीच दखल घ्यावी, यंत्रणेने दखल घ्यावी अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)


चिपळूण नगरपालिकेतील विषय समिती सभापतीपदांची निवड झाल्यानंतर सभापती, उपसभापती ठरले. नावे निश्चित झाल्यानंतर पालिकेत येणाऱ्या लोकांना नवे सभापती कोण आहेत हे कळणार कसे, हा प्रश्न अनुत्तरीतच आहे.


चिपळूण नगर परिषदेतील प्रकार.
सभापती केबीनमधील नावे बदलली.
संबंधितांनी वेळीच दखल घेण्याची मागणी.
निवड जाहीर होऊनही फलक बदलले नाहीत.

Web Title: Chairman changed; The nameplate is still the same

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.