शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: पुन्हा अतिवृष्टीचे संकट? आज, उद्या 'या' जिल्ह्यांत पाऊस घालणार धुमाकूळ, IMD सतर्कतेचा इशारा
2
"उद्ध्वस्त एअरबेस, जळालेले हँगर हा तुमचा विजय?"; भारताची पाकिस्तानला सणसणीत चपराक
3
काळाचा घाला! गुरुग्राममधील भीषण अपघातात ५ जणांचा जागीच मृत्यू, थारचा चक्काचूर
4
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केली तर २४ महिन्यांनंतर किती रुपये मिळतील? पटापट पाहा कॅलक्युलेशन
5
केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी, प्रस्ताव मिळताच मदतनिधी देणार; PM नरेंद्र मोदींचं आश्वासन
6
चैतन्यनंदचे काळे कारनामे! मुलींची निवड करुन त्यांना कसं बनवायचा गुलाम?, खळबळजनक खुलासा
7
आजचे राशीभविष्य, २७ सप्टेंबर २०२५: जमीन, घर अथवा वाहन खरेदीसाठी आजचा दिवस अनुकूल नाही
8
ठाण्यात भाजपा-शिंदेसेनेत संघर्ष; एकनाथ शिंदेंच्या अध्यक्षतेत बैठकीला गणेश नाईकांचा ‘बहिष्कार’
9
आधी नगरपालिका की जिल्हा परिषद?;निवडणूक आयोगाची दोन्हींसाठी तयारी सुरू
10
कुजबुज! ओल्या दुष्काळात काजू-बदामची चर्चा; शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी अन् राजकीय चिखलफेक
11
१६५ तोळे सोने, दोन किलो चांदी अन् ११ लाख राेख देऊनही छळ; मायानगरी मुंबईत विवाहितेचा गर्भपात
12
मढ बेट बनावट नकाशा प्रकरणाची गहाळ फाइल शोधा, अन्यथा गुन्हा दाखल करा; हायकोर्टाचे निर्देश
13
पीएनबी घोटाळा: सीबीआय न्यायालयात अर्जास मान्यता; नीरव मोदीचा मेव्हणा ‘माफीचा साक्षीदार’
14
‘सीएसएमटी’वरील १८ नंबरचा प्लॅटफॉर्म ३ महिने बंद राहणार; १ ऑक्टोबरपासून पायाभूत कामे
15
दुरुस्तीच्या कामासाठी रेल्वेचा मेगाब्लॉक; तिन्ही मार्गांवर रविवारी होणार ‘प्रवासखोळंबा’
16
तीन कोटी खर्चून ‘उपचार’, तरीही आईची प्रकृती सुधारेना; मुलाची पोलीस स्टेशनला तक्रार, तपास सुरू
17
चिंताजनक ‘लडाख फाइल्स’! सोनम वांगचुक यांना देशद्रोही ठरवून तुरुंगात सडविणे दिसते तितके सोपे नाही
18
सत्ता येते-जाते, साहित्यिक संस्थांवर ‘कब्जा’ हवा! मोक्याच्या जागेसाठी लागल्या राजकीय नजरा
19
ट्रम्प, जिमी किमेल आणि गुदगुल्यांचा ‘खंजीर’! ही एकी जगभरातील माध्यमांसाठी एक संदेशच...

CoronaVirus Kankavli Sindhudurg : कणकवली तालुक्यातील साखळी काही तुटेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 15:20 IST

CoronaVirus Kankavli Sindhudurg : गतवर्षीच्या लाटेत जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण हे कणकवली तालुक्यातीलच होते आणि आता दुसऱ्या लाटेतदेखील रुग्ण आढळण्याचे प्रमाण कणकवली तालुक्यातच जास्त आहे. त्यामुळे कणकवली तालुका हा कोरोनाचा हॉटस्पॉट बनला आहे. कणकवली तालुक्यातील साखळी काही तुटेना.

ठळक मुद्देकणकवली तालुक्यातील साखळी काही तुटेना कोरोनाने आणखी तिघांचा मृत्यू. ५३ रुग्ण आढळले

कणकवली : कणकवली तालुक्यात मंगळवारी नव्याने ५३ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत, तर तिघांचा मृत्यू झाला आहे.  सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोरोनाचा पहिला रुग्ण हा कणकवली तालुक्यातील खारेपाटण नडगिवे गावातूनच आढळला होता. त्यानंतर गतवर्षीच्या लाटेत जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण हे कणकवली तालुक्यातीलच होते आणि आता दुसऱ्या लाटेतदेखील रुग्ण आढळण्याचे प्रमाण कणकवली तालुक्यातच जास्त आहे. त्यामुळे कणकवली तालुका हा कोरोनाचा हॉटस्पॉट बनला आहे. कणकवली तालुक्यातील साखळी काही तुटेना.कणकवली तालुक्यात मंगळवारी सापडलेल्या कोरोनाबाधित रुग्णांमध्ये कणकवली शहरातील ११, हळवल ४, कुंभवडे १, नाटळ १, हरकुळ बुद्रुक ३, घोणसरी १, फोंडा ११, कळसुली २, शिवडाव ३, ओटव ४, शिडवणे १, कसवण १, ओसरगाव २, जानवली २, भिरवंडे २, कलमठ ३, तर खारेपाटण येथील एका रुग्णाचा समावेश आहे. तालुक्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांमध्ये वारगाव येथील ७० वर्षीय पुरुष, हरकुळ येथील ६८ वर्षीय पुरुष, तर कलमठ येथील ६५ वर्षीय महिलेचा समावेश आहे. दरम्यान, कणकवली तालुक्यात कोरोनाचा प्रभाव वाढत असून, नागरिकांनी आपल्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.सध्या कोरोनाची साखळी तोडण्यासाठी कणकवली तालुक्यात १ ते १० मे दरम्यान जनता कर्फ्यूचे आयोजन करण्यात आले आहे. त्याला चांगला प्रतिसादही मिळत आहे. मात्र, जनता कर्फ्यू संपला की, पुन्हा नागरिक बाजारपेठांमध्ये तुफान गर्दी करतील. त्या गर्दीवर कोणाचेही नियंत्रण राहणार नाही आणि पुन्हा रुग्णसंख्येला आवर घालणे कठीण बनणार आहे. त्यामुळे याबाबत नियोजन होणे गरजेचे आहे.तालुक्यात कोरोनाचा विस्फोट सुरूसिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोरोनाचा पहिला रुग्ण हा कणकवली तालुक्यातील खारेपाटण नडगिवे गावातूनच आढळला होता. त्यानंतर गतवर्षीच्या लाटेत जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण हे कणकवली तालुक्यातीलच होते आणि आता दुसऱ्या लाटेतदेखील रुग्ण आढळण्याचे प्रमाण कणकवली तालुक्यातच जास्त आहे. त्यामुळे कणकवली तालुका हा कोरोनाचा हॉटस्पॉट बनला आहे.आरोग्य विभागाने तालुक्यात सर्व्हे करणे आवश्यककोरोनाचे रुग्ण हे कणकवली तालुक्यातील सर्वच गावांमध्ये कमी-अधिक प्रमाणात आढळत आहेत. त्यामुळे हे रुग्ण आढळण्याची कारणे शोधण्यासाठी आरोग्य विभागाने काहीतरी स्वतंत्र यंत्रणा राबवून जास्त रुग्ण असलेल्या गावात सर्व्हे करणे आवश्यक आहे. त्यासाठी स्वतंत्र टीमची निर्मिती करणे आवश्यक आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याKankavliकणकवलीhospitalहॉस्पिटलsindhudurgसिंधुदुर्ग