शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

विजयदुर्ग किल्ल्यावर तोफगाडा लोकार्पण जल्लोषात, कोल्हापुरातील छत्रपती ब्रिगेडमार्फत सोहळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2025 18:43 IST

देव गड : ढोल-ताशांच्या गजरात सोमवारी सकाळी साडेनऊ वाजता विजयदुर्ग गडाची विधीवत पूजा करून कोल्हापूर येथील छत्रपती ब्रिगेडमार्फत तोफगाडा ...

देवगड : ढोल-ताशांच्या गजरात सोमवारी सकाळी साडेनऊ वाजता विजयदुर्ग गडाची विधीवत पूजा करून कोल्हापूर येथील छत्रपती ब्रिगेडमार्फत तोफगाडा लोकार्पण सोहळा मोठ्या जल्लोषात झाला. विजयदुर्ग अष्टशताब्दी किल्ले महोत्सवाचे अध्यक्ष तथा धुळप घराण्याचे वंशज सरदार रघुनाथराव धुळप यांच्या हस्ते पूजन करून तोफगाडा अर्पण करण्यात आला. यावेळी किल्ले विजयदुर्ग प्रेरणोत्सव समितीचे संस्थापक अध्यक्ष राजीव परुळेकर यांनी खड्या आवाजात म्हटलेल्या शिवप्रार्थनेने आणि शिवगर्जनेने विजयदुर्ग किल्ला दुमदुमून गेला.यावेळी बॉनी नोरोन्हा, सरपंच रियाज काझी, विजयदुर्ग प्रेरणोत्सव समिती अध्यक्ष प्रसाद देवधर, सह्याद्री प्रतिष्ठानचे कोकण सचिव दीपक करंजे, विठ्ठलवाडी मित्रमंडळाचे अध्यक्ष संजय सावंत, युवा उद्योजक शंकर सागवेकर, विजयदुर्ग ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत बिडये, माजी उपसरपंच महेश बिडये, प्रदीप साखरकर, ग्रेसीस फर्नांडिस, व्यावसायिक विद्याधर माळगांवकर, सुरेश उर्फ अण्णा सावंत, यशपाल जैतापकर, मिलिंद वाडये, गीता लळीत आणि असंख्य विजयदुर्गवासीय उपस्थित होते.तसेच, कोल्हापूर येथील छत्रपती ब्रिगेडचे अतुल माने यांच्यासह सत्यजित पवार, संदीप जाधव, शिवाजीराव कागीलकर, रवी मोरे, तोफगाड्याची निर्मिती करणारे प्रद्युम्न सुतार यांच्यासह वीस कार्यकर्ते तोफगाडा अर्पण सोहळ्यात सामील झाले होते.

सुरुवातीला विजयदुर्ग किल्ल्याच्या प्रमुख प्रवेशद्वारावर सरदार रघुनाथराव धुळप यांच्या हस्ते गडकिल्ल्याचे पूजन करण्यात आले. यावेळी छत्रपती ब्रिगेडचे पदाधिकारी व कार्यकर्ते आणि विजयदुर्ग येथील शिवप्रेमी उपस्थित होते. त्यानंतर ढोलताशांच्या गजरात सर्व शिवप्रेमी भवानी मातेच्या मंदिराकडे मार्गस्थ झाले. या ठिकाणी तुळजाभवानीचे पूजन आणि आरती करण्यात आली. यानंतर सर्व जण मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर ठेवण्यात आलेल्या तोफगाड्यावर आले. सरदार धुळप यांच्या हस्ते तोफगाड्याची पूजा करून हा तोफगाडा लोकार्पण करण्यात आला.योगदान दिलेल्या सदस्यांचा सत्कारयावेळी राष्ट्रीय संस्कार संवर्धन मंडळाच्या वतीने विद्याधर माळगांवकर यांच्या हस्ते आणि यांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी योगदान दिलेल्या सदस्यांचा शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. दरम्यान, सरदार रघुनाथराव धुळप यांनी छत्रपती ब्रिगेडच्या या शिवकार्यासाठी दहा हजार रुपयांची देणगी दिली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजीव परुळेकर यांनी केले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गFortगड