शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

किल्ले सिंधुदुर्गचा ३५१ वा वर्धापन दिन साजरा, थरारक मर्दानी खेळांची सलामी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2018 15:13 IST

मालवण समुद्रातील किल्ले सिंधुदुर्गच्या ३५१ व्या वर्धापन दिनानिमित्त मोरयाचा धोंडा याठिकाणी गणेश पूजन तर किल्ले सिंधुदुर्गातील शिवराजेश्वर मंदिरात शिवाजी महाराजांच्या मूर्तिचे पूजन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयजयकाराच्या गगनभेदी घोषणा आणि थरारक मर्दानी खेळाच्या सलामीने वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

ठळक मुद्देकिल्ले सिंधुदुर्गचा ३५१ वा वर्धापन दिन साजराथरारक मर्दानी खेळांची सलामी  शिवराजेश्वर मंदिरात शिवाजी महाराजांच्या मूर्तिचे पूजन

मालवण : मालवण समुद्रातील किल्ले सिंधुदुर्गच्या ३५१ व्या वर्धापन दिनानिमित्त मोरयाचा धोंडा याठिकाणी गणेश पूजन तर किल्ले सिंधुदुर्गातील शिवराजेश्वर मंदिरात शिवाजी महाराजांच्या मूर्तिचे पूजन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयजयकाराच्या गगनभेदी घोषणा आणि थरारक मर्दानी खेळाच्या सलामीने वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला.मालवण येथील किल्ले सिंधुदुर्गच्या उभारणीस ३५१ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने किल्ले सिंधुदुर्ग प्रेरणोत्सव समिती, वायरी भूतनाथ ग्रामपंचायत आणि मालवण नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी सिंधुदुर्ग किल्ल्याचा ३५१ वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला.

सकाळी ७ वाजता दांडी-वायरी किनाऱ्यावरील मोरयाचा धोंडा याठिकाणी वायरी सरपंच घन:श्याम ढोके यांच्या हस्ते श्री गणेश पूजन करण्यात आले. यानंतर सिंधुदुर्ग किल्ल्यातील शिवराजेश्वर मंदिरात तहसीलदार समीर घारे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तिची पूजा करण्यात आली.

मालवण येथील किल्ले सिंधुदुर्गच्या वर्धापन दिनानिमित्त भाजप नेते व शिवप्रेमींनी महाराजांना अभिवादन केले. मालवण किल्ले सिंधुदुर्ग येथील शिवराजेश्वर मंदिर परिसरात मर्दानी खेळांची सलामी देण्यात आली.

यावेळी तहसीलदार समीर घारे, भाजप नेते अतुल रावराणे, नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, किल्ले प्रेरणोत्सव समितीच्या उपाध्यक्षा ज्योती तोरसकर, भाजप तालुकाध्यक्ष विजय केनवडेकर, सेजल परब, तृप्ती मयेकर, आपा लुडबे, गणेश कुशे, भाऊ सामंत, मंदिराचे पुजारी श्रीराम सकपाळ, दत्तात्रय नेरकर, प्रदीप वेंगुर्लेकर, बबलू राऊत, महेश मांजरेकर, रविकिरण आपटे, विकी तोरसकर, हेमंत वालकर, सूर्यकांत फणसेकर, प्राचार्य डॉ. श्रीरंग मंडले, डॉ. आर. एन. काटकर, डॉ. एम. आर. खोत, नंदकुमार घाडी, प्रदीप मयेकर, वायरी भूतनाथ ग्रामपंचायत सदस्य शिला लुडबे, कविता मोंडकर, संगीता चव्हाण, विरेश नाईक आदी उपस्थित होते.

मंदिरात आयोजित कार्यक्रमात किल्ले सिंधुदुर्ग प्रेरणोत्सव समितीचे अध्यक्ष गुरुनाथ राणे यांच्या सिंधुदुर्ग- प्राचीन अर्वाचीन प्रवास या पुस्तकाचे प्रकाशन भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमोद जठार म्हणाले, सिंधुदुर्ग किल्ल्याच्या देखभाल व संवर्धनासाठी शासनाकडून निधी मंजूर झाला असून लवकरच याबाबतचा आराखडा निश्चित करून कामही सुरू होईल, असा विश्वास व्यक्त केला.ऐतिहासिक स्थळांची माहिती सर्वदूर पोहोचावीतहसीलदार समीर घारे यांनी सिंधुदुर्ग किल्ल्याच्या संवर्धनासाठी सर्व घटकांना सोबत घेऊन सर्वांनी एकत्रित प्रयत्न केले पाहिजेत असे सांगितले. त्याचप्रमाणे किल्ल्याबरोबरच किल्ल्याशी संबंधित असणाऱ्या मालवणमधील इतर ऐतिहासिक स्थळांकडेही लक्ष देणे गरजेचे असून त्यांचेही संवर्धन करून या स्थळांची माहिती सर्वांपर्यंत पोहोचवली पाहिजे असेही घारे यांनी सांगितले.

सूत्रसंचालन ज्योती तोरसकर यांनी केले. शिवराजेश्वर मंदिराच्या परिसरात न्यू शिवाजी ब्रिगेड, कोल्हापूर यांच्या पथकाने विविध चित्तथरारक मर्दानी खेळ सादर करीत शिवरायांना सलामी दिली. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गFortगडMalvan beachमालवण समुद्र किनारा