³सतरा वर्षांनी स्नेहबंधाच्या आठवणींना उजाळा
By Admin | Updated: November 12, 2014 22:50 IST2014-11-12T21:36:58+5:302014-11-12T22:50:38+5:30
विद्यार्थी स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने एकत्र : सावंतवाडीत १९९७ च्या बीएस्सी बॅचचा मेळावा

³सतरा वर्षांनी स्नेहबंधाच्या आठवणींना उजाळा
सावंतवाडी : शाळा, कॉलजचे दिवस संपले की प्रत्येकजण आपआपल्या करिअरसाठी वेगवेगळ््या क्षेत्राकडे धाव घेतो. मात्र, ज्या शाळेमध्ये, ज्या कॉलेजमध्ये आपण शिकलो, लहानाचे मोठे झालो, वेगवेगळ््या भागातील विद्यार्थ्यांबरोबर आपण मैत्रीचे नाते जोडले, ती नाळ मात्र तशीच असते. सर्वांना एकदा भेटावे, एकमेकांशी हितगुज करावे, असे सर्वांना वाटते. मात्र, प्रत्येकजण आपआपल्या नोकरीधंद्यात व्यस्त असल्याने ते सहजासहजी शक्य होत नाही. मात्र, ते अशक्यही नाही.
श्री पंचम खेमराज महाविद्यालयात १९९७ साली बीएस्सीची पदवी घेऊन बाहेर पडलेले विद्यार्थी स्रेहसंमेलनाच्या निमित्ताने एकत्र आले आणि १७ वर्षांनी कॉलेज जीवनातील स्रेहबंधाच्या आठवणींना उजाळा मिळाला. या आगळ््यावेगळ््या कार्यक्रमाने सारेच भारावून गेले आणि पूर्वीच्या आठवणी, नोकरी-धंदा करताना आलेले बरे-वाईट अनुभव अशा अनेक गोष्टी एकमेकांशी शेअर केल्या.
येथील पंचम खेमराज महाविद्यालयात १९९७ साली रसायन शास्त्र, प्राणी शास्त्र, वनस्पती शास्त्र अशा वेगवेगळ््या विषयात बीएस्सी पदवी घेऊन बाहेर पडलेल्या आणि आज वेगवेगळ््या क्षेत्रात करिअर करणाऱ्या १९९७ सालच्या बीएस्सी बॅचच्या विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा एकत्र येण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ज्यांच्याकडे एकमेकांचे पत्ते किंवा फोन नंबर होते त्यांनी ही कल्पना एकमेकांना सांगितली आणि साऱ्यांनीच ती उचलून धरली.
एक महिना अगोदर याबाबतची तयारी सुरू झाली. त्यानुसार ९ नोव्हेंबर रोजी हे सर्व माजी विद्यार्थी सावंतवाडीतील हॉटेल मँगोच्या सभागृहात एकत्र आले.
केवळ एकत्रच आले नाही तर त्यांनी त्यावेळचे प्राणीशास्त्राचे प्राध्यापक आणि आताचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिलीप भारमल यांनाही या आगळ््यावेगळ््या कार्यक्रमासाठी निमंत्रिक केले. डॉ. भारमलदेखील याच आपुलकीने या छोटेखानी समारंभात सहभागी झाले. सुरूवातीला या कार्यक्रमासाठी पुढाकार घेणारे माजी विद्यार्थी दत्तप्रसाद ठाकूर यांनी या कार्यक्रमाची संकल्पना स्पष्ट केली आणि नंतर प्रत्येकाने आपापली पुन्हा एकदा ओळख करून देत आपण कोणत्या क्षेत्रात काम करीत आहोत, याबाबतची माहिती दिली. प्राचार्य डॉ. दिलीप भारमल यांनीही आपल्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देताना महाविद्यालयाचे वेगवेगळे उपक्रम आणि प्रगतीबाबत माहिती दिली. कॉलेजमधून पदवी घेऊन बाहेर पडून अनेक वर्षे झाली. प्रत्येकजण वेगवेगळ््या क्षेत्रात करिअर करीत आहे. तरीही एकमेकांबद्दलचा स्रेहभाव कमी झालेला नाही. गुरूजनांबद्दलचा जपलेला आदरभाव पाहून प्राचार्य
डॉ. भारमल यांनीही या सर्व माजी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. आपल्या कॉलेजचे विद्यार्थी वेगवेगळ््या क्षेत्रात काम करीत असून त्यांनी कॉलेजचे नाव उज्ज्वल केले आहे, अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त करीत शुभेच्छा दिल्या.
यावेळी माजी विद्यार्थ्यांच्यावतीने प्राचार्य डॉ. दिलीप भारमल यांचा खास सत्कारही करण्यात आला. दुपारच्या सत्रात स्रेहभोजनानंतर माजी विद्यार्थ्यांनी कॉलेज सोडल्यानंतर पुढील शिक्षणासाठी जाताना किंवा करिअरच्या वाटा धुंडाळताना आलेले अनुभव एकमेकांना शेअर केले.
तसेच आपले कलागुणही सादर केले. हे करीत असताना प्रत्येक विद्यार्थ्यांच्या डोळ््यात एकमेकांबद्दलचा स्रेहभाव दृढ झालेला पहायला मिळाला. आपण वेगवेगळ््या क्षेत्रात असलो तरी एकमेकांच्या नेहमीच संपर्कात राहूया, एकमेकांसाठी नेहमीच मदतीचा हात पुढे करूया, असा निर्धार या विद्यार्थ्यांनी केला. तसेच यापुढे दरवर्षी या स्रेहसंमेलनाच्यानिमित्ताने एकत्र येण्याचा निर्णयही घेण्यात आला.
पंचम खेमराजचे प्राध्यापक डॉ. मर्गज तसेच माजी विद्यार्थी दत्तप्रसाद ठाकूर, मनोहर गोवेकर, अजित सावंत, प्रसाद वालावलकर, मुस्तफा काझी, संजय गवस, अमोल राणे, गोविंद धुरी, नीलेश तेरसे, फिरोज शेख, अमित काणेकर, शैलेश शिरोडकर, परशुराम नाटेकर, वासुदेव नार्वेकर, विनायक कविटकर, उन्नती उकडीवे, नूतन कर्पे, प्रज्ञा परब, मिलन दळवी, किरण धुरी, सोनी पोकळे, स्मिता देऊलकर, सोनाली तिरोडकर, विद्या सावळ, सफुरा बेग, नजत राजगुरू, व्हलेंटीना फर्नांडीस, स्मिता ठाकूर, प्रज्ञा वालावलकर, योगिता कोरगावकर आदी माजी विद्यार्थी उपस्थित
होते. (प्रतिनिधी)