आदरांजली वाहण्यासाठी कणकवली येथे डबलबारी भजन सामना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 14:31 IST2017-10-04T14:31:26+5:302017-10-04T14:31:26+5:30
कणकवली येथील तेलीआळी मधील सुदर्शन मित्रमंडळाच्यावतीने 5 ऑक्टोबर रोजी रात्री 8 वाजता डबलबारी भजनांचा सामना आयोजित करण्यात आला आहे. देवगड तालुक्यातील नाडण येथील श्री महादेश्वर प्रासादिक भजन मंडळाचे बुवा संदीप पुजारे (भजन सम्राट जयराम घाडीगावकर यांचे शिष्य) तसेच खुडी येथील श्री भूतेश्वर प्रासादिक भजन मंडळाचे बुवा संतोष जोईल( भजन सम्राट श्रीधर मुणगेकर यांचे शिष्य) यांच्यात हा सामना रंगणार आहे.

आदरांजली वाहण्यासाठी कणकवली येथे डबलबारी भजन सामना
कणकवली, दि. 04 :येथील तेलीआळी मधील सुदर्शन मित्रमंडळाच्यावतीने 5 ऑक्टोबर रोजी रात्री 8 वाजता डबलबारी भजनांचा सामना आयोजित करण्यात आला आहे.
देवगड तालुक्यातील नाडण येथील श्री महादेश्वर प्रासादिक भजन मंडळाचे बुवा संदीप पुजारे (भजन सम्राट जयराम घाडीगावकर यांचे शिष्य) तसेच खुडी येथील श्री भूतेश्वर प्रासादिक भजन मंडळाचे बुवा संतोष जोईल( भजन सम्राट श्रीधर मुणगेकर यांचे शिष्य) यांच्यात हा सामना रंगणार आहे.
बुवा संतोष जोईल यांना शाम तांबे हे पखवाज तर अक्षय मेस्त्री तबला साथ करणार आहेत. तर बुवा संदीप पूजारे यांना मंजिल काळसेकर पखवाज व विनीत मांजरेकर तबला साथ करणार आहेत. सायंकाळी 6 वाजता जानवली येथील बुवा शशिकांत राणे यांचे ही भजन तेलीआळी डी.पी. रोड येथे होणार आहे.
21 सप्टेंबर 1968 रोजी सर्वपित्री अमावास्येदिवशी मालवण येथे डबलबारी भजनाला जात असताना येथील सुदर्शन भजन मंडळाच्या ट्रकला गडनदी पुलावर अपघात झाला होता. या अपघातात कणकवलीतील तेलीआळी, हर्णेआळी येथील 40 हुन अधिक भजन रसिक दगावले होते. त्यांच्या स्मृतिना उजाळा देण्यासाठी तसेच त्यांना आदरांजली वाहण्यासाठी दरवर्षी या डबलबारी भजनाच्या सामन्याचे आयोजन सुदर्शन मित्र मंडळाकडून सर्वपित्री अमावास्येला केले जाते. मात्र , यावर्षी जोरदार पावसामुळे हा डबलबारी भजनाचा सामना रद्द करण्यात आला होता. कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी गुरुवारी आता हा डबलबारी सामना होणार आहे.