शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

पोलिस कर्मचाऱ्याला मारहाण प्रकरणी शिवसैनिकावर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 18:33 IST

Crimenews Sindhudurg- आचऱ्याहून वाळू भरून येणारा ट्रक अडवून चालकाशी वाद घालत असताना पोलीस हवालदार झुजे फर्नाडिस हे वाद सोडवण्यासाठी गेले असता त्यांना शिवीगाळ करत मारहाण करून धमकी दिल्याप्रकरणी रमेश अशोक चव्हाण ( ३१ , कलमठ ) या शिवसैनिका विरोधात कणकवली पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . ही घटना गुरुवारी रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास कणकवलीतील पोलीस पेट्रोल पंपाजवळ घडली .

ठळक मुद्दे वाळू वाहतूक करणारा ट्रक अडवून करत होता वाद भांडण मिटविण्यासाठी गेलेल्या पोलिसाला केली मारहाण

कणकवली : आचऱ्याहून वाळू भरून येणारा ट्रक अडवून चालकाशी वाद घालत असताना पोलीस हवालदार झुजे फर्नाडिस हे वाद सोडवण्यासाठी गेले असता त्यांना शिवीगाळ करत मारहाण करून धमकी दिल्याप्रकरणी रमेश अशोक चव्हाण ( ३१ , कलमठ ) या शिवसैनिका विरोधात कणकवली पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . ही घटना गुरुवारी रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास कणकवलीतील पोलीस पेट्रोल पंपाजवळ घडली .याबाबत कणकवली पोलिस ठाण्यातील वाहन चालक हवालदार झुजे फर्नाडिस यांनी दिलेल्या तक्रारीनुसार रीमेश चव्हाण हा कणकवली पोलीस पेट्रोल पंपाजवळ आचरा येथून येणारा वाळू भरलेला ट्रक अडवून चालकाशी बाचाबाची करीत होता . त्याच्या भांडणाचा आवाज ऐकून आपण भांडण सोडविण्यासाठी पुढे गेलो. त्यावेळी रिमेश याने मला शिवीगाळ करून किरकोळ मारहाण केली व धमकी दिली .दरम्यान, याबाबत हवालदार फर्नाडिस यांनी दिलेल्या तक्रारीनुसार भा.द.वि. कलम ३५३ , ३३२ , ५०६ , ५०४ , १८८,२६९, २७० अन्वये रिमेश चव्हाण याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच रिमेश चव्हाण याने आपल्याला मारहाण करून अंगावरील शर्ट फाडल्याची तक्रार दिल्यानुसार झुजे फर्नाडिस यांच्याविरुद्ध कणकवली पोलिसात भा . द . वि . कलम ३२३ , ४२७ नुसार अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे . याप्रकरणी वाळू वाहतूक करणारा ट्रक पोलिसांनी ताब्यात घेतला असून , त्या ट्रकवर कारवाईबाबत महसूलला माहिती देण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले .

टॅग्स :Policeपोलिसsindhudurgसिंधुदुर्गKankavli Police Stationकणकवली पोलिस स्टेशन