शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांवर पेट्रोल ओतणार्‍या त्या मुलावर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 17:39 IST

Crime News Sindhudurg police-कणकवलीतील अप्पासाहेब पटवर्धन चौकात सेवा बजावत असलेल्या वाहतूक शाखेच्या पोलिसांवर शनिवारी सायंकाळी पेट्रोल ओतणार्‍या त्या अल्पवयीन मुलावर कणकवली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हा मुलगा अल्पवयीन असल्याने पोलिसांनी त्याला शनिवारी मध्यरात्रीनंतर कुडाळ येथील बाल न्यायालयात हजर केले. या न्यायालयाकडून त्याला योग्य त्या अटी, शर्तींवर आई-वडिलांच्या ताब्यात देण्यात आले.

ठळक मुद्देपोलिसांवर पेट्रोल ओतणार्‍या त्या मुलावर गुन्हा दाखल अल्पवयीन असल्याने आई-वडिलांच्या ताब्यात

कणकवली : कणकवलीतील अप्पासाहेब पटवर्धन चौकात सेवा बजावत असलेल्या वाहतूक शाखेच्या पोलिसांवर शनिवारी सायंकाळी पेट्रोल ओतणार्‍या त्या अल्पवयीन मुलावर कणकवली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हा मुलगा अल्पवयीन असल्याने पोलिसांनी त्याला शनिवारी मध्यरात्रीनंतर कुडाळ येथील बाल न्यायालयात हजर केले. या न्यायालयाकडून त्याला योग्य त्या अटी, शर्तींवर आई-वडिलांच्या ताब्यात देण्यात आले.कणकवली शहरातील अप्पासाहेब पटवर्धन चौकात शनिवारी सायंकाळी सेवा बजावत असलेले वाहतूक शाखेचे पोलीस हवालदार विश्वजीत परब व चंद्रकांत माने तसेच नगर पंचायत कर्मचारी प्रदीप गायकवाड यांच्या अंगावर पाठीमागून येऊन या अल्पवयीन मुलाने पेट्रोल ओतले होते. पोलिसांनी विरूद्ध दिशेने महामार्गावरून जाणार्‍या या मुलाला अडविल्याच्या रागातून त्याने हे कृत्य केले होते.अचानक झालेल्या या प्रकारानंतर स्थानिक नागरिकांनी त्याला चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले होते.पोलिसांनी माहिती घेतली असता, तो अल्पवयीन असल्याचे समजले. वाहतूक शाखेचे पोलीस व नगर पंचायत कर्मचार्‍याने दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी या मुलावर शनिवारी रात्री सरकारी कामात अडथळा आणणे, प्राणघातक हल्ला करणे तसेच सरकारी कर्मचाऱ्यांना दुखापत करणे आदी कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर पोलिसांनी त्याला बाल न्यायालय, कुडाळ येथे रात्री उशिरा हजर केले.

या न्यायालयाकडून त्याला योग्य त्या अटी व शर्तींवर आई-वडिलांच्या ताब्यात दिले. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक ए. आय. मुल्ला करत आहेत. दरम्यान, शनिवारी रात्री पोलीस उपविभागीय अधिकारी डॉ. नितीन कटेकर यांनी घटनास्थळी भेट देत फॉरेन्सिक लॅबच्या पथकासह काही पुरावे गोळा केले होते. जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी ही घटना गांभिर्याने घेतली असून त्या दृष्टीने अधिक तपास केला जात आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीsindhudurgसिंधुदुर्गRto officeआरटीओ ऑफीसKankavli Police Stationकणकवली पोलिस स्टेशन