मारहाण प्रकरणी ;
By Admin | Updated: October 30, 2015 23:26 IST2015-10-30T23:02:00+5:302015-10-30T23:26:17+5:30
तीन महिने कारावास : ३६ हजाराचा दंड

मारहाण प्रकरणी ;
सावंतवाडी : पोलीस हेडस्कॉन्स्टेबल डुमिन अंतोन डिसोजा यांना मारहाण केल्याप्रकरणी चेतन वल्लभ फडते (वय २१ रा. पेडणे गोवा) याच्यासह सहा जणांना गुरूवारी न्यायालयाने दोषी ठरवून विविध कलमांखाली तीन महिन्यांची साधी कैद व प्रत्येकी सहा हजार रूपयांची दंडात्मक शिक्षा सुनावली. ही शिक्षा न्यायाधीश भेंडवडे यांच्या न्यायालयाने
सुनावली.
२९ सप्टेंबर २०१२ रोजी दुपारी ११.३० वाजण्याच्या सुमारस आरोंदा किरणपाणी येथे घडला होता. आरोंदा किरणपाणी येथे कार्यरत असलेले पोलीस हेडकॉन्स्टेबल डुमिंग डिसोजा हे किरणपाणी येथे बोटीजवळ कार्यरत होते.
यावेळी त्याठिकाणी गोवा येथील चेतन वल्लभ फडते, रजत शंकर मांजरेकर (वय १८), भुषण तुकाराम पेडणेकर (वय २५), अश्वीन सायमन नरोरा (वय २०), रामनाथ वल्लभ फडते (वय २३), अतुल रोहीदास चोडणकर (वय २०) या सर्वांनी आपल्या मोटारसायकल वाहतुकीस अडथळा होईल अशा स्थितीत लावून ठेवल्या होत्या. तसेच किरणपाणीमध्ये जाणाऱ्या वाहतुकीसही अडथळा निर्माण करीत होते.
यावेळी तेथे कार्यरत असणारे पोलीस हेडकॉन्स्टेबल डुमिंग डिसोजा यांनी या सर्वांना गाड्या बाजूला घेण्यास सांगितल्या. मात्र यावेळी या तरूणांनी डिसोजा यांच्याशी बाचाबाची करीत शिवीगाळ करून ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी या सहा जणांविरूद्ध कलम ३५३, ३३२, १४३, १४७, १४०, ५०४, ५०६ सह १४९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
याप्रकरणी या सर्वांना दोषी ठरवून शिक्षा ठोठावली
आहे. (वार्ताहर)