कासार्डे बाजार व्यापारी, ग्राहकांमुळे हाऊसफुल्ल

By Admin | Updated: February 2, 2015 00:06 IST2015-02-01T21:16:27+5:302015-02-02T00:06:42+5:30

विजयकुमार वळंजू : भविष्यात निश्चितच आर्थिक प्रगती होईल, तक्रार नोंदवहीचा अभिनव उपक्रम

Casarde Bazar Trader, Housesful due to customer | कासार्डे बाजार व्यापारी, ग्राहकांमुळे हाऊसफुल्ल

कासार्डे बाजार व्यापारी, ग्राहकांमुळे हाऊसफुल्ल

नांदगाव : कासार्डेचा बाजार पंचक्रोशीतील लोकांना सोयीचा आहे. ही बाजारपेठ समृद्ध होऊन वाढीस लागावी. पहिल्याच दिवशी मिळालेल्या उदंड प्रतिसादामुळे भविष्यात हा बाजार अजूनही फुलेल, वाढेल आणि चांगला बाजार म्हणून जिल्ह्यात नावारूपास येईल. यामुळे निश्चितच आर्थिक प्रगती होईल, असे प्रतिपादन जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष विजयकुमार वळंजू यांनी केले. कासार्डे येथे रविवारचा आठवडा बाजार नव्याने सुरू झाला. यावेळी झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर सरपंच संतोष पारकर, शांतीनाथ लडगे, पंचायत समिती सदस्य संजय देसाई, व्यापारी संघटना अध्यक्ष श्रीपत पाताडे, संजय नकाशे, प्रणिता पाताडे, तंटामुक्त अध्यक्ष दत्तात्रय शेटये, बाळाराम तानवडे, प्रकाश पारकर, नीळकंठ पाटील, चंद्रकांत चव्हाण, सुधाकर रावले, श्रीराम कुडतरकर, पी. एस. पाटील, राजाराम पाटील, वेळगिवे सरपंच संतोष चव्हाण, ओझरम सरपंच प्रदीप राणे, बाप्पी मांजरेकर, मानसी वाळवे, सीमा भांबुरे, प्रवीण पोकळे, दत्तात्रय कल्याणकर, राजू देसाई, राजेंद्र सावंत, संजय पाताडे, श्रावणशेठ बांदिवडेकर, गोपाळ बांदिवडेकर, सुप्रिया पाताडे, श्रीरंग पाताडे, डॉ. अरविंद कुडतरकर, पुंडलिक पाताडे, अमोल जमदाडे, बबन मुणगेकर, सर्व व्यापारी संघटनेचे सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते.यावेळी वळंजू म्हणाले की, कासार्डेत बाजार भरविण्याची प्रथम संधी १९७७ मध्ये मिळाली होती. मात्र, दुर्दैवाने त्यावेळी शक्य झाले नाही. आज त्या संधीची मुहूर्तमेढ रोवली गेली. आज यासाठी दाखविलेली एकजूट याहीपुढे अशीच राहिली पाहिजे. यानिमित्ताने एक सांगेन की, व्यापाऱ्यांनी व्यापार करताना शिक्षणाकडेही लक्ष द्यावे. या बाजारामुळे निश्चितच इतर प्रगती होईल. मात्र, तितकेच शिक्षणाकडेही लक्ष द्यावे. यावेळी संजय देसाई, प्रकाश पारकर, प्रणिता पाताडे, संजय पाताडे यांनी मनोगत व्यक्त केले. (वार्ताहर)

अभिनव उपक्रम
कासार्डे येथील व्यापारी संघटनेकडून संघटनेच्या कार्यालयात तक्रार नोंदवही ठेवण्यात आलेली आहे. कोणत्याही प्रकारची तक्रार असल्यास ती त्यामध्ये नोंद करावी. त्याची ताबडतोब दखल घेतली जाईल, असे संघटनेकडून सांगण्यात आले. तसेच रविवारी बँक सुरू राहण्यासाठी तसेच एटीएम व त्या अनुषंगाने इतर सोयी-सुविधा उपलब्ध होण्यासाठी संघटनेच्यावतीने प्रयत्न सुरू असून लवकरच या सुविधा उपलब्ध होतील. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार श्रीपत पाताडे यांनी मानले.

व्यापाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती
पहिल्यांदाच भरलेल्या कासार्डे येथील रविवारच्या आठवडा बाजाराला विविध प्रकारची दुकाने घेऊन व्यापारी उपस्थित राहिले. भाजी, किराणा, हॉटेल, सुकी-ओली मासळी, विविध प्रकारचे मसाले अशा विविध प्रकारचे व्यापारी या बाजारासाठी आले. त्याहीपेक्षा जास्त संख्या ग्राहकांची असलेली पाहायला मिळाले. व्यापारी व ग्राहकांच्या लक्षणीय उपस्थितीमुळे पहिलाच बाजार असल्याचे जाणवले नाही.

Web Title: Casarde Bazar Trader, Housesful due to customer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.