शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

वैभववाडीत कोल्हापुरातील कारचालकासह चौघांना चोपले, पोलिसांसमोरच जोरदार राडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2025 15:59 IST

बसस्थानकासमोर वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती

वैभववाडी : वैभववाडी बसस्थानकासमोर कारने दुचाकीला धडक दिल्यानंतर वैभववाडीत जोरदार राडा झाला. संतप्त स्थानिक तरुणांनी पोलिसांसमोरच कारचालक आणि त्याच्या तीन सहकाऱ्यांना चोप दिला. या प्रकारामुळे बसस्थानकासमोर वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती. हा प्रकार बुधवारी (दि. १८) सायंकाळी पावणेपाच वाजण्याच्या सुमारास घडला.रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम सुरू असल्यामुळे सध्या वाहतूक कोंडी होत असते. बुधवारी वैभववाडीचा आठवडा बाजार होता. त्यामुळे बाजारपेठेत मोठी गर्दी होती. दरम्यान, कोल्हापूरमधील पाचजण एका आलिशान कारमधून कणकवलीला जात होते. वैभववाडी बसस्थानकासमोर एका नगरसेवकाच्या दुचाकीला या कारची धडक बसली. यात दुचाकीचे नुकसान झाले. त्यामुळे त्या नगरसेवकाने कारचालकाकडे विचारणा केली असता दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाची सुरू झाली. कारमध्ये बसलेले तीन तरुणही त्या नगरसेवकाशी हुज्जत घालू लागले. हे पाहून नगरसेवकाचा आजूबाजूला असलेला मित्रपरिवार काही मिनिटांत तेथे जमा झाला.

कारमधील तरुणीने मागितली माफीरस्त्याच्या मधोमध गाडी उभी असल्यामुळे आणि शेकडोंची गर्दी जमा झाल्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या. पोलिसांनी ती कार बसस्थानकाच्या आवारात नेली. प्रकरण आपल्यावर उलटणार, याची कल्पना आल्याने कारमधील तरुणी ‘आमची चूक झाली. आम्ही माफी मागतो’ अशी विनवणी करत होती. परंतु, कुणीही ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. त्याचवेळी नगरसेवकाचा मोठा मित्र परिवार तेथे आला. चर्चा सुरू असतानाच संतप्त स्थानिकांनी कारमधील चौघांना बाहेर घेत मारहाण करण्यास सुरुवात केली.पोलिसांनी तरुणांना बाजूला करून कारमधील सर्वांना पोलिस ठाण्यात नेले. दीड तास पोलिस स्थानकात चर्चा सुरू होती. त्यानंतर तेथे ज्येष्ठ मंडळी दाखल झाली. त्यांनी मध्यस्थी करत त्या नगरसेवकाची समजूत काढली. त्यानंतर या प्रकरणावर पडदा पडला.

वैभववाडीत वाहतूक कोंडीशुकनदी ते शांतीनदीपर्यंतच्या रस्त्याचे काम सुरू आहे. त्यामुळे एकाच बाजूने वाहतूक सुरू असते. दोन मोठी वाहने समोरासमोर आल्यानंतर वाहतुकीची खूप मोठी समस्या निर्माण होते. वैभववाडी शहरात वाहतूक कोंडीमुळे अशा प्रकारांना सामोरे जावे लागत आहे.