महिला उमेदवारांसाठी शोध मोहीम सुरू

By Admin | Updated: February 26, 2015 00:13 IST2015-02-25T22:55:15+5:302015-02-26T00:13:14+5:30

जिल्ह्यातील एकूण ४७२ ग्रामपंचायतींच्या १४८४ प्रभागांमध्ये ही निवडणूक होणार आहे. यासाठी जिल्ह्यातील नऊ तालुक्यांमधील एकूण सदस्य संख्या ३८६१ इतकी आहे.

The campaign for women candidates is going on | महिला उमेदवारांसाठी शोध मोहीम सुरू

महिला उमेदवारांसाठी शोध मोहीम सुरू

रत्नागिरी : जुलै २०१५ ते डिसेंबर २०१५ या कालावधीत मुदती संपणाऱ्या जिल्ह्यातील एकूण ४७२ ग्रामपंचायतींच्या होणाऱ्या निवडणुकीसाठी एकूण ३८६१ इतकी सदस्य संख्या असून, त्यापैकी २१६६ इतकी पदे महिला सदस्यांसाठी आरक्षित ठेवण्यात आली आहेत. म्हणजे केवळ १६९५ जागांवरच पुरूष उमेदवारांना हक्क सांगता येणार आहे. महिलांच्या जागा अधिक असल्याने प्रत्येक पक्ष आतापासूनच या उमेदवारांचा शोध घेण्याची मोहीम उभारू लागला आहे. जुलै २०१५ ते डिसेंबर २०१५ या कालावधीत मुदती संपणाऱ्या रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका तसेच विविध कारणांनी रिक्त झालेली पदे भरण्यासाठी ग्रामपंचायतीच्या पोट निवडणुका एप्रिल २०१५ मध्ये होणार आहेत. यासाठी निवडणूक कार्यक्रमही जाहीर होणार आहे. त्यामुळे जात वैधता प्रमाणपत्र मिळविण्यासाठी आवश्यक ते कागदपत्र आताच सादर करून हे प्रमाणपत्र घ्यावे लागणार आहे. जिल्ह्यातील एकूण ४७२ ग्रामपंचायतींच्या १४८४ प्रभागांमध्ये ही निवडणूक होणार आहे. यासाठी जिल्ह्यातील नऊ तालुक्यांमधील एकूण सदस्य संख्या ३८६१ इतकी आहे. यामध्ये सर्वसाधारण महिला उमेदवारांची संख्या १८८६ इतकी आहे. तर अनुसुचित जातीसाठी १३२, अनुसुचित जमातीसाठी २१ आणि नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी ५२७ इतक्या आरक्षित जागा आहेत. यापैकी सर्वसाधारण प्रवर्गातील महिला उमेदवारांना जात पडताळणी प्रमाणपत्राची आवश्यकता नाही. मात्र, उर्वरित अनुसुचित जात, अनुसुचित जमात आणि नागरिकांचा मागास प्रवर्गातील एकूण ६८० महिला उमेदवारांना जातपडताळणी अनिवार्य असणार आहे.
निम्म्यापेक्षा अधिक असलेल्या या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत महिला उमेदवारांसाठी आरक्षणाच्या जागा अधिक असल्याने आत्तापासूनच सर्वत्र महिला उमेदवार शोधण्यासाठी मोहीम सुरू करण्यात आली आहे. विविध पक्ष आता या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी करू लागले आहेत.
प्रत्येक तालुक्यात निवडणुका जाहीर झालेल्या ग्रामपंचायतींची संख्या जास्त असल्याने, त्यातील राखीव असणाऱ्या महिलांच्या जागांसाठी आता चाचपणी सुरू करण्यात आली आहे.
योग्य महिला उमेदवार देणे, ही प्रत्येक पक्षासाठी कसोटीच ठरणार असल्याने आता यासाठी कुठल्या महिलांना संधी मिळणार, याची उत्सुकता सर्वच तालुक्यांना लागून राहिली आहे. (प्रतिनिधी)

जिल्ह्यातील ग्रामपंचायतींची संख्या, एकूण सदस्य, एकूण महिला (अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती, नागरिकांचा मागासप्रवर्ग,
सर्वसाधारण मिळून एकूण तालुकानिहाय)

तालुकाग्रा.प.एकूण अनु.अनु. नामाप्र सर्वसाधारणएकूण सदस्य जात जमात महिला
मंडणगड१५११३०७०५१५३७६४
दापोली५३४५१०७०६६०१७९२५२
खेड ८७६८१२८०६९४२५६३८४
चिपळूण ८३६९३१९०४९२२७३३८८
गुहागर २९२३९०३००३३९८१३४
संगमेश्वर ७७६१५२९००८३२३४३४६
रत्नागिरी ५३४९७२४००७३१७८२७५
लांजा २३१७५०७००२३६९९९
राजापूूर ५१३९७०८००५४१६२२२४
एकूण४७२३८६११३२२१५२७१४८६२१६६

Web Title: The campaign for women candidates is going on

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.