अपघाताचा बहाणा करून बांधकाम व्यावसायिकाला लुटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2019 20:13 IST2019-05-15T20:13:31+5:302019-05-15T20:13:35+5:30
सावंतवाडी येथील बांधकाम व्यावसायिक अजय गोंधळे यांना पुण्यावरून सावंतवाडीच्या दिशेने येत असताना आंबोली येथे चार ते पाच जणांनी अपघाताचा बहाणा करून लुटल्याची घटना घडली आहे.

अपघाताचा बहाणा करून बांधकाम व्यावसायिकाला लुटले
आंबोली : सावंतवाडी येथील बांधकाम व्यावसायिक अजय गोंधळे यांना पुण्यावरून सावंतवाडीच्या दिशेने येत असताना आंबोली येथे चार ते पाच जणांनी अपघाताचा बहाणा करून लुटल्याची घटना घडली आहे. त्यांच्याकडे असलेल्या दागिन्यासह पैसे घेऊन अज्ञात चोरट्यांनी लुटून पलायन केले. हा प्रकार बुधवारी चार वाजण्याच्या सुमारास आंबोली घाटातील नाना पाणीजवळ घडला आहे. तत्पूर्वी डंपरच्या माध्यमातून त्यांनी गोंधावळे यांच्या गाडीला अपघात केला व याबाबत विचारणा करण्यासाठी गोंदावळे गेले असता त्यांनी त्यांना लुटले. कालच आंबोली येथे लुटण्याचा घडलेला प्रकार ताजा असतानाच पुन्हा प्रकार घडल्यामुळे आंबोली घाटातील सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
याबाबतची तक्रार देण्यासाठी गोंदावळे यांनी येथील पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे. झालेला प्रकार असा गोंदावले हे आपल्या घरातील नातेवाईकांसह पुणे ते फिरण्यासाठी गेले होते. तेथून परतत असताना आंबोली येथे नाना पाणी वळणावर एक अपघात झाला होता. ट्राफिक जाम झाले होते त्यामुळे गोंदावले यांनी आपली गाडी थांबवली अपघाताची माहीती घेत असताना मागून भरधाव येणार्या एका कर्नाटक पासिंग डंपरने त्यांच्या कालला मागून धडक दिली. अपघाताचा आवाज येताच गोंदावले यांनी त्याना विचारणा करण्यासाठी त्या ठिकाणी धाव घेतली यावेळी त्यातील दोघांनी त्यांच्या गाडीची चावी काढून घेण्याचा प्रयत्न केला व अन्य तिघांनी त्यांच्या गळ्यात हातात असलेले सोन्याचे दागिने खेचून घेतले व डंपर चालू करून तेथून पलायन केले.
यावेळी गोंदावले हे कुटुंबासमवेत असल्यामुळे तसेच परिसरात रेंज नसल्यामुळे. तेथे फोन करू शकले नाही अखेर त्यांनी आत्ताच सावंतवाडी पोलीस ठाण्यात धाव घेतली असून अज्ञात चोरट्यांच्या विरोधात तक्रार देण्यात आली आहे त्याचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे दरम्यान सांयकाळी उशिरा स्वाभिमानचे तालुकाध्यक्ष संजू परब यानी पदाधिकारी व कार्यकर्ते याच्यासह पोलीस ठाण्यात धाव घेतली व आरोपीचा तातडीने शोध घ्या अशी मागणी केली.