शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कोकणचे निसर्ग सौंदर्य आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचवा, नितेश राणे यांचे आवाहन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2024 15:54 IST

कणकवली:   कोकणात निसर्ग सौंदर्य खूप सुंदर आहे. ते पाहण्यासाठी जगातील पर्यटक कोकणात यावेत याकरिता युटूबर्स, एन्फ्ल्यूएंझर्स व सोशल ...

कणकवली:  कोकणात निसर्ग सौंदर्य खूप सुंदर आहे. ते पाहण्यासाठी जगातील पर्यटक कोकणात यावेत याकरिता युटूबर्स, एन्फ्ल्यूएंझर्स व सोशल मीडियावर फेमस असलेल्या कलाकारांनी कोकणातील निसर्ग सौंदर्यावर रिल्स तयार केल्या पाहिजेत. त्या जगभरातील पर्यटकांपर्यंत पोचल्या पाहिजेत. कोकणातील सर्वांगसुंदर असलेले निसर्ग सौंदर्य आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचविण्यासाठी कोकणातील क्रियेटर्सनी रिल्स व मिम्स च्या माध्यमातून प्रयत्न करावेत. असे आवाहन आमदार नितेश राणे यांनी केले.आमदार नितेश राणे यांच्या संकल्पनेतून मिम्स व रिल कोकण सन्मान स्पर्धा २०२४ आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा जानवली येथील हॉटेल नीलम कंट्रीसाईट येथे झाला. यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार नितेश राणे यांच्या पत्नी नंदिता राणे, मुलगा निमिष राणे, युटूबर्स व एन्फ्ल्यूएंझर्स श्रुतिका कोळंबेकर, मंगेश काकड, सोहम शहाणे, कुहू परांजपे, प्रशांत नाक्ती, वृषाली जावळे, प्रसाद विधाते, शंतनू रांगणेकर, अंकिता प्रभू- वालावलकर, गणेश चनारे, गौरी पवार, सिद्धांत जोशी आदी उपस्थित होते.राणे म्हणाले, कोकणातील युट्यूब व सोशल मीडियावर रिल्स व मिम्स बनविणाऱ्या कलाकारांना एकत्र आण्यासाठी हिंदू स्पर्धा आयोजित केली आहे. या कालाकारांना व्यासपीठ मिळावे हा हेतू स्पर्धा घेण्यामागील आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी लक्षदीपला भेट दिली होती. या भेटीदरम्यान त्यांनी लक्षदीपच्या समुद्र किनारी फोटो काढले होते. त्यानंतर लक्षदीपला भेट देण्यासाठी पर्यटकांचा ओढा वाढला आहे. मालदीव व लक्षदीप प्रमाणेच कोकणातील किनारपट्टी व निसर्ग सौदर्य अप्रतिम आहे. कोकणातील समुद्र किनारे व निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी जगातील पर्यटक याठिकाणी यावेत यासाठी कोकणातील समुद्र किनारे व निसर्ग सौदर्याची माहिती पर्यटकांपर्यंत पोहोचवणे नितांत गरजेचे आहे. याकरिता युटूबर्स, एन्फ्ल्यूएंझर्स व सोशल मीडियावर फेमस असलेल्या कलाकारांनी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.रिल्स व मिम्स बनविण्यासाठी कलाकारांना खूप मेहनत घ्यावी लागते. मात्र, त्यांनी रिल्स व मिम्स बनविताना आपल्या जीवाची काळजी घेतली पाहिजे. काही दिवसांपूर्वी कणकवलीतील रिल्स बनविणाऱ्या एका कलाकाराचा अपघाती मृत्यू झाला, त्याच्या मृत्यूची बातमी ऐकल्यानंतर माझे मन्न सुन्न झाले. कारण तुम्ही कलाकार आमच्यासाठी व आपल्या कुटुंबासाठी खूप महत्वाचे आहात. त्यामुळे कलाकारांनी रिल्स व मिम्स बनताना जीवितास कोणातीही थोका निर्माण होणार नाही, याची काळाजी घेऊन ते बनवावेत, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गkonkanकोकण