शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांसाठी महायुतीचा 'वचननामा' जाहीर; ५ वर्षांसाठी पाणीपट्टी स्थगीत, महिलांसाठी BESTचे अर्धे तिकीट अन् बरंच काही!
2
इंडियन आयडल-3 चा विजेता प्रशांत तमांग काळाच्या पडद्याआड; वयाच्या 43व्या घेतला अखेरचा श्वास
3
"एक मंत्री आहे, नेपाळ्यासारखा...", नितेश राणेंवर टीका करताना अबू आझमींची जीभ घसरली
4
महायुतीचा वचननामा: मुंबई लोकल अन् मेट्रोचा प्रवास करणाऱ्या मुंबईकरांसाठी जाहीरनाम्यात काय?
5
“काँग्रेसने कितीही प्रयत्न केले तरी लाडकी बहीण योजनेचे पैसे थांबवू शकत नाहीत”: CM फडणवीस
6
“भारत देश सर्वार्थाने सामर्थ्यशाली करा, आपल्या इतिहासाचा प्रतिशोध घ्यायचा आहे”: अजित डोवाल
7
बनावट कोर्ट, खोटे न्यायाधीश आणि १५ कोटींचा गंडा; निवृत्त डॉक्टर दाम्पत्यासोबत मोठा फ्रॉड!
8
‘गझनीपासून औरंगजेबापर्यंत इतिहासात गडप झाले, पण सोमनाथ…’, मोदींचं मोठं विधान
9
BMC Election 2026: ...तर १६ तारखेनंतर 'जय श्रीराम' म्हणता येणार नाही; नितेश राणेंचा ठाकरे बंधूंवर हल्लाबोल!
10
"उगाच अभिषेकचं नाव कशाला घेता?"; तेजस्वी घोसाळकरांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार
11
११ लाखांची पैज! संजय राऊतांचे CM फडणवीसांना ओपन चॅलेंज; म्हणाले, “हिंमत दाखवा अन्...”
12
Exclusive: महेश मांजरेकरांकडून अमित ठाकरेंना होती 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमाची ऑफर, स्वत:च केला खुलासा
13
इराणमध्ये सरकारविरोधी आंदोलन तीव्र; आंदोलकांना थेट मृत्युदंडाचा इशारा
14
महिलांना आत्मनिर्भर करणारी योजना! ४,४५० रुपयांच्या योजनेवर मिळवा १६ लाखांचा निधी
15
IND vs NZ 1st ODI Live Streaming : रोहित-विराट पुन्हा मैदानात उतरणार; कोण ठरणार सगळ्यात भारी?
16
“काँग्रेसच्या १५ वर्षांच्या राजवटीत भोगावा लागलेला वनवास दूर करत परिवर्तन घडवा”: एकनाथ शिंदे
17
चक्क साडी नेसून मैदानात उतरल्या महिला; फुटबॉल सामन्याचा व्हिडिओ इंटरनेटवर घालतोय धुमाकूळ!
18
SBI एटीएम व्यवहारांच्या शुल्कात वाढ; सॅलरी अकाउंटसाठी 'अनलिमिटेड' फ्री ट्रान्झॅक्शनची सुविधा बंद
19
पूजा खेडेकरला बांधून ठेवलं, आई-वडिलांना गुंगीचं औषध दिलं, अन…, नोकरानेच केली घरात चोरी
20
IND vs NZ 1st ODI : नव्या वर्षात टीम इंडियासाठी 'शुभ' संकेत! डावखुऱ्या हाताने नाणे उंचावत गिल ठरला 'उजवा' अन्...
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा शल्य चिकित्सकपदी निष्क्रिय माणूस आणला : परशुराम उपरकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2020 11:55 IST

CoronaVirus, sindhudurg, hospital, Parshuram Upkar जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकुरकर यांची बदली करीत त्यांच्या जागेवर दोन वेळा निलंबित झालेल्या श्रीमंत चव्हाण या निष्क्रिय अधिकाऱ्याला आणल्याचा घणाघाती आरोप मनसे सरचिटणीस, माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केला आहे.

ठळक मुद्देजिल्हा शल्य चिकित्सकपदी निष्क्रिय माणूस आणला : परशुराम उपरकररुग्णवाहिका न मिळाल्याने महिलेचा मृत्यू

कणकवली : जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकुरकर यांची बदली करीत त्यांच्या जागेवर दोन वेळा निलंबित झालेल्या श्रीमंत चव्हाण या निष्क्रिय अधिकाऱ्याला आणले आहे. त्यामुळे शिवसेनेला सत्ता असताना जिल्हा रुग्णालयात तक्रार निवारण केंद्र सुरू करण्याची वेळ आली असल्याचा घणाघाती आरोप मनसे सरचिटणीस, माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केला आहे.

सिंधुदुर्गातील निवडून आलेले आमदार, खासदार, पालकमंत्री जनतेचे आरोग्य राखण्यात अपयशी ठरले आहेत. मालवण येथील महिलेला रुग्णवाहिका साडेपाच तास न मिळाल्याने तिचा मृत्यू झाला आहे.सिंधुदुर्गचे पालकमंत्री, खासदार, आमदार केवळ घोषणा करीत आहेत. मेडिकल कॉलेज, महिला रुग्णालय व येथील जिल्हा रुग्णालयात वेगवेगळ्या सेवांचे लोकार्पण करीत जनतेची दिशाभूल करीत आहेत. लोकप्रतिनिधींना नागरिकांचे जीव वाचवायचे की गमवायचे आहेत? नागरिकांना आरोग्याच्या विवंचनेत ठेवून केवळ पत्रकबाजी व फोटोसेशन करण्यामध्ये सत्ताधारी रमले आहेत. सर्वच जिल्ह्यातील आरोग्य रुग्णालयांमध्ये दयनीय अवस्था आहे. रुग्णांना सेवा मिळत नाही, अनेक रिक्त पदे आहेत. त्यावर सत्ताधारी मूग गिळून गप्प बसले आहेत.सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नवनियुक्त जिल्हा शल्य चिकित्सक श्रीमंत चव्हाण हे दोन वेळा निलंबित झालेले आहेत. कुडाळ रुग्णालयात त्यांची सेवा नागरिकांना माहीत आहे. देवगडमध्ये बदली झाल्यानंतर वर्षभर कामावर हजर झाले नव्हते.अनेक ठिकाणी त्यांची सेवा फारशी चांगली राहिलेली नाही. त्यामुळे त्यांच्याकडून जिल्हा रुग्णालयात नागरिकांना आरोग्य सेवा मिळणार आहे का? हा प्रश्न उपस्थित होत असल्याचे माजी आमदार परशुराम उपरकर यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याsindhudurgसिंधुदुर्गhospitalहॉस्पिटलParshuram Upkarपरशुराम उपरकर