लाभार्थीकडून लाच मागितली

By Admin | Updated: August 22, 2014 21:43 IST2014-08-22T21:43:13+5:302014-08-22T21:43:13+5:30

बदलीची मागणी : कणकवली पंचायत समिती बैठक

The bribe was asked by the beneficiary | लाभार्थीकडून लाच मागितली

लाभार्थीकडून लाच मागितली

कणकवली : घरकुल योजनेच्या प्रस्तावाची रक्कम अदा करण्यासाठी लाभार्थीकडून पैशांची मागणी करणाऱ्या अधिकाऱ्यावर बदलीची कारवाई करण्यात यावी, असा मागणी सदस्यांमधून करण्यात आली. सभापती मैथिली तेली यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा झाली. उपसभापती बबन हळदिवे, गटविकास अधिकारी एम.ए.गवंडी उपस्थित होते.
तालुक्यातील एका गावातील महिला लाभार्थी असलेल्या घरकुलाचा प्रस्तावाची रक्कम मंजूर करण्यासाठी पंचायत समितीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने संबंधित लाच मागितली. ही बाब निंदनीय असून पुन्हा असे प्रकार होऊ नये, असे सदस्यांमधून सांगण्यात आले. महेश गुरव यांनी सांगितल्यानुसार त्या अधिकाऱ्याची बदली करण्यात यावी, ्रअसा ठराव घेण्यात आला.
गणेश चतुर्थीपूर्वी कालावधीत भारनियमन करू नये, अशी सूचना सुरेश सावंत यांनी मांडली. तालुक्यासाठी दहा वायरमनची मागणी केली आहे. सोमवारपर्यंत पाच कर्मचारी देण्यात येतील. ते आवश्यक त्या ठिकाणी वापरले जातील, असे वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. पिसेकामते गावात गेला महिनाभर रोज सायंकाळी ७ नंतर वारंवार वीज खंडीत होत असल्याकडे महेश गुरव यांनी लक्ष वेधले. कोणत्याही योजनेचे प्रशिक्षण आयोजित करताना त्याची पूर्वकल्पना सदस्यांना देण्यात यावी, अशी सूचना भाग्यलक्ष्मी साटम यांनी केली.
बिडवाडी पशुसंवर्धन विभागाला जिल्हा परिषदेकडून मिनरल मिक्स्चर पावडर देण्यात आली होती. या पावडरच्या भरलेल्या पिशव्या आजूबाजूला पडलेल्या आढळल्या. याची चौकशी करण्यात यावी, अशी सूचना महेश गुरव यांनी मांडली. पियाळी नदीच्या दोन्ही बाजूच्या वळणांचे रूंदीकरण करण्यात यावे, असा ठराव घेण्यात आला.
करंजे येथील अंध, अपंगांच्या विनाअनुदानित शाळेस पोषण आहार मिळत नाही. तालुक्यात अशा ५६ शाळा असून शासनाच्या माध्यमातून त्यांना पोषण आहार दिला जावा, अशी सूचना बाबा वर्देकर यांनी केली. जानवली सापळे गॅरेज येथील मोरी खचली असून नवीन बांधण्यात यावी अशी सूचना श्रीया सावंत यांनी केली. जानवली बौद्धवाडी येथील कॉजवे खराब झाल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले. पंचायत समिती सेसच्या २० टक्के अनुदानातून घरदुरूस्ती, १० टक्के निधीतून अंगणवाडीसाठी वजनकाटे तसेच पशुसंवर्धन विभागाकडून पाच शेळ्या व एक बोकड वाटप योजनेचा करण्याबाबत ठराव घेण्यात आला. (प्रतिनिधी)

Web Title: The bribe was asked by the beneficiary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.