राजापूर : शहरातील फणसवडी येथे एका लॅटट्राइट दगडावर कोरीव धनुष्यबाण, तर एक भग्नावस्थेतील मूर्ती सापडली आहे. याच ठिकाणी काही मंदिरेही दिसली आहेत. कोदवली नदीच्या काठी सापडलेला हा पुरातन ठेवा आहे. ही कला ऐतिहासिक चित्रणकला असल्याचे मत पुरातत्व अभ्यासकांनी व्यक्त केले आहे.
अधिकारीपदी निवड झाली, पण २२ जणांना पत्रच नाही; ५ महिन्यांपासून नियुक्तीसाठी ताटकळत ठेवले
फणसवडी येथे कोदवली नदीच्या काठी एक वरचा घुमट नसलेले एकाष्म मंदिर सापडले आहे. या ठिकाणी सापडलेली अन्य दोन मंदिरे ही एकावर एक दगड रचून तयार केलेली आहेत. या मंदिरांची उंची साधारण पाच ते सहा फूट असून, साधारण पाच बाय चारच्या लांबी-रुंदीची ही मंदिरे आहेत. ही मंदिरे आणि इथे सापडलेली मूर्ती, तसेच दगडावरील धनुष्यबाण हे प्राचीन असून, त्याला ऐतिहासिक महत्त्व असल्याचे सांगण्यात येत आहे. राजापूर येथील दगडावर बाण आणि कमानीच्या चिन्हाचे चित्रण हे कदाचित ऐतिहासिक चित्रण कला आहे.
राजापूरजवळील जंगलामध्ये नव्याने शोधलेले बाण आणि धनुष्य यांची प्रतिकृती चितारलेला कातळ महाराष्ट्राच्या पुरातत्वीय आणि सांस्कृतिक वारशाचा एक महत्त्वाचा भाग आहे. त्यांच्या सखोल अभ्यासातून आपल्याला कोकणातील मानवी इतिहासातील जीवनशैली, राहणीमानाचा व सांस्कृतिक जडणघडणीचा एक महत्त्वाचा टप्पा अभ्यासता येईल.
सचिन पाटील, पुरातत्व अभ्यासक