राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांकडून

By Admin | Updated: June 6, 2014 00:09 IST2014-06-06T00:06:03+5:302014-06-06T00:09:50+5:30

वेंगुर्ले नगराध्यक्ष पदासाठी अर्ज

From both groups of NCP | राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांकडून

राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांकडून

वेंगुर्ले : वेंगुर्ले नगराध्यक्ष पदासाठी होणार्‍या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीच्या एका गटातर्फे प्रसन्ना कुबल तर दुसर्‍या गटाकडून मनीष परब यांची नामनिर्देेशन पत्रे दाखल करण्यात आली आहेत.
वेंगुर्ले नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक प्रक्रिया सुरु झाली आहे. आज गुरुवारी सकाळी १0 ते २ या वेळेत दोन्ही गटांच्या उमेदवारांनी नामनिर्देशन पत्रे दाखल केली.
प्रसन्ना कुबल यांनी सादर केलेल्या दोन नामनिर्देशन पत्रामधील एका अर्जावर सूचक म्हणूक चेतना केळूसकर तर अनुमोदक म्हणून अन्नपूर्णा नार्वेकर तर दुसर्‍या नामनिर्देशन पत्रात सूचक म्हणून सुलोचना तांडेल व अनुमोदक म्हणून पद्मिनी सावंत यांनी सह्या केलेल्या आहेत.कुबल यांनी अर्ज दाखल करताना माजी नगराध्यक्षा सुलोचना तांडेल, रमण वायंगणकर, पद्मिनी सावंत, अन्नपूर्णा नार्वेकर, चेतना केळूसकर आदी उपस्थित होते.
राष्ट्रवादीच्या दुसर्‍या गटाकडून मनीष परब यांनी नामनिर्देशन दाखल केले असून त्यावर सूचक म्हणून शैलेश गावडे व अनुमोदक म्हणून पूजा कर्पे यांच्या सह्या आहेत. यावेळी परब यांच्यासोबत राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष अ‍ॅन्थोनी डिसोजा, शैलेश गावडे, पूजा कर्पे, वामन कांबळे, नम्रता कुबल, महेश वेंगुर्लेकर व दाजी परब उपस्थित होते.
या निवडणुकीत राष्ट्रवादीतर्फे जिल्हाध्यक्ष व्हिक्टर डान्टस व्हिप काढणार असूून या व्हिपचे पालन सर्व नगरसेवक करणार का? याबाबत प्रश्न उपस्थित होत आहे. मनीष परब यांना व्हिक्टर डान्टस यांनी पक्षातर्फे उमेदवारी दिली आहे. त्यामुळे परब अधिकृत उमेदवार ठरणार आहेत. तर कुबल हे केसरकर समर्थक म्हणून ओळखले जातात. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख ९ जून असून १0 जूनला नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक होणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: From both groups of NCP