शहरं
Join us  
Trending Stories
1
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
2
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
3
भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?
4
"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?
5
घरची गरिबी, टोमणे सहन केले, पण मानली नाही हार, बनली बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे मीनाक्षी हुड्डा
6
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
7
Akshay Kumar : सातवीत नापास झाला होता अभिनेता अक्षय कुमार; लहानपणी पाहिलेलं 'हे' स्वप्न
8
Road Rage Case: ट्रक चालकाचे अपहरण; पूजा खेडकरच्या वडिलांच्या ड्रायव्हरला अटक, आई- वडील फरार
9
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
10
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
11
सूर्य ग्रहण २०२५: चंद्रग्रहणात केला तोच उपाय सूर्यग्रहणातही, साठवणीच्या अन्न-पाण्यावर ठेवा तुळशीचे पान 
12
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
13
असा पैसा काय कामाचा? "मी कामावर जाण्यापूर्वी रोज रडते"; ४० लाख पगार, पण समाधान नाही
14
Asia Cup: संजू सॅमसनची धमाकेदार फटकेबाजी! एका खेळीने धोनीला टाकलं मागे, केला मोठा विक्रम
15
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
16
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."
17
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
18
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
19
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
20
ठाण्यातील अवजड वाहन बंदीचा ताप! मुंबई अहमदाबाद महामार्गावर देखील अवजड वाहनांना बंदी

त्या योजनेचा बोजवारा, वैभववाडी भाजपाचे तहसीलदारांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2020 19:00 IST

राज्य सरकारच्या बांधावर खते आणि बियाणे वाटप योजनेचा बोजवारा उडाला असून कर्जमाफी योजनेची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही. त्यामुळे ऐन खरिपाच्या तोंडावर शेतकरी अडचणीत आला असल्याने सरकारने तत्काळ कर्जवाटप आणि खतपुरवठा करावा, अशी मागणी तालुका भाजपाच्यावतीने निवेदनाद्वारे तहसीलदारांकडे करण्यात आली आहे.

ठळक मुद्देत्या योजनेचा बोजवारा, वैभववाडी भाजपाचे तहसीलदारांना निवेदन कर्जमाफी फसवी ठरल्याचाही आरोप

वैभववाडी : राज्य सरकारच्या बांधावर खते आणि बियाणे वाटप योजनेचा बोजवारा उडाला असून कर्जमाफी योजनेची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही. त्यामुळे ऐन खरिपाच्या तोंडावर शेतकरी अडचणीत आला असल्याने सरकारने तत्काळ कर्जवाटप आणि खतपुरवठा करावा, अशी मागणी तालुका भाजपाच्यावतीने निवेदनाद्वारे तहसीलदारांकडे करण्यात आली आहे.भाजप पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी तहसीलदारांना निवेदन दिले. यावेळी तालुकाध्यक्ष नासीर काझी, सभापती अक्षता डाफळे, जयेंद्र रावराणे, अरविंद रावराणे, दिलीप रावराणे, भालचंद्र साठे, राजेंद्र राणे, किशोर दळवी, हर्षदा हरयाण, शुभांगी पवार आदी उपस्थित होते.

भाजपाने तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सध्या कोरोनाचे संकट आहे म्हणून खरीप हंगाम थांबणार नाही. परंतु राज्य सरकारकडून खरीप हंगामाच्या दृष्टीने कोणतीही पूर्वतयारी करण्यात आलेली नाही. सरकारने बांधावर बियाणे आणि खत पुरविण्याची योजना जाहीर केली; परंतु ती पूर्णत: असफल ठरली आहे.

शेतकऱ्यांना अजूनही खते मिळालेली नाहीत. दुसरीकडे जिल्हा बँकेकडून कर्ज वाटपाच्या याद्या तयार होऊनही शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा झालेली नाही. शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेचा लाभ अद्याप अनेक शेतकऱ्यांना झालेला नाही. याशिवाय नियमित कर्जाची परतफेड करणारे शेतकरी प्रोत्साहन अनुदानापासून वंचित आहेत. त्यांचा त्वरित कर्जमाफीच्या यादीत समावेश करावा, अशा विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना दिले आहे.तालुक्यात एसटी सेवा सुरू करालॉकडाऊनमुळे तालुक्यातील संपूर्ण एसटी सेवा बंद आहे. त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. ही बाब लक्षात घेऊन तालुक्यात एसटी बससेवा तातडीने सुरु करावी, अशी मागणी भाजपतर्फे स्वतंत्र निवेदनाद्वारे नायब तहसीलदार ए. के. नाईक यांच्याकडे करण्यात आली आहे.कर्जमाफीपासून शेतकरी वंचितशासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेचा लाभ अद्याप शेतकऱ्यांना झालेला नाही. भाजपा सरकारने खावटी कर्जधारक शेतकऱ्यांना मंजूर केलेले १३ कोटी रुपयेसुद्धा मिळालेले नाहीत. शासनाच्या कर्जमाफीपासून अनेक शेतकरी वंचित आहेत. 

टॅग्स :GovernmentसरकारBJPभाजपाTahasildarतहसीलदारsindhudurgसिंधुदुर्ग