शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
16
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
17
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
18
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
19
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
20
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?

वागदे गडनदी पात्रात बुडालेल्या युवकाचा मृतदेह सापडला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2022 14:16 IST

कणकवली : गडनदीवरील वागदे गावाजवळील वाघाचा वाफा येथील डोहातील पाण्यात सुजल अशोक परूळेकर (१८, रा.वायंगवडे, मालवण) हा युवक बुडाला ...

कणकवली : गडनदीवरील वागदे गावाजवळील वाघाचा वाफा येथील डोहातील पाण्यात सुजल अशोक परूळेकर (१८, रा.वायंगवडे, मालवण) हा युवक बुडाला होता. रविवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली होती. मित्रांसमवेत आंगोळीसाठी गेला असताना नदीपात्राचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडाला होता. सोमवारी सकाळी ११.४० वाजण्याच्या सुमारास तब्बल अठरा तासांनंतर त्याचा मृतदेह सापडला.मालवण तालुक्यातील वायंगवडे गावातील सुजल परूळेकर व त्याचा मोठा भाऊ आदित्य परूळेकर हे कणकवलीतील एका हॉटेलमध्ये कामाला आहेत. हॉटेलमधील कामाची वेळ संपल्यानंतर रविवारी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास सुजल हा मित्रांसमवेत वागदे गावातील गडनदीच्या वाघाचा वाफा येथील डोहाजवळ गेला होता. सर्व मित्र खुबे काढत असताना सुजल हा काहीसा पाण्यात पुढे गेला. तो पाण्यात बुडू लागल्याने त्याने वाचविण्यासाठी आरडाओरडा केला. मित्रानी त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला, मात्र, तोपर्यंत तो पाण्यात दिसेनासा झाला होता.मित्रांनी तत्काळ या घटनेची माहिती हेल्पलाईनवर संपर्क करून दिली. त्यानंतर कणकवली पोलिसांनाही माहिती देण्यात आली. गडनदीच्या पात्रात युवक बुडाल्याचे समजल्यानंतर कणकवलीचे पोलिस निरीक्षक सचिन हुंदळेकर, पोलिस हवालदार पांडुरंग पांढरे, उबाळे, वागदे पोलिस पाटील सुनील कदम यांच्यासह हॉटेलचे मालक व सुजलचे मित्र व भाऊ हे घटनास्थळी पोहोचले. दोरीच्या सहाय्याने नदीपात्रात उतरून काही तरुणांनी सुजल याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. पण तो सापडू शकला नाही.त्यामुळे आज, सोमवारी सकाळी करूळ येथील अकरा जणांच्या घोरपी बांधवांच्या टीमने पुन्हा नदीपात्रात शोध मोहिम राबविली. त्यावेळी सुजलचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी पंचनामा केल्यानंतर कणकवली उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी मृतदेह नेण्यात आला. यावेळी पोलीस उपनिरीक्षक हाडळ, हवालदार गुरव, दत्ता सावंत, किरण मेथे, सुप्रिया भागवत आदी पोलिसांचे पथक उपस्थित होते.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गdrowningपाण्यात बुडणे