शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
4
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
5
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
6
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
7
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
8
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
9
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
10
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
11
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
12
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
13
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
14
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
15
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
16
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
17
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
18
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
19
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
20
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली

Sindhudurg: ..अखेर खारेपाटणमध्ये नदीत बुडालेल्या युवकाचा मृतदेह सापडला

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: February 28, 2025 16:44 IST

संतोष पाटणकर खारेपाटण : कणकवली तालुक्यातील खारेपाटण येथे शुकनदीत बुडालेल्या युवकाचा मृतदेह अखेर दोन दिवसांनी सापडला. कुडाळ, पिंगुळी येथील दिगंबर ...

संतोष पाटणकरखारेपाटण : कणकवली तालुक्यातील खारेपाटण येथे शुकनदीत बुडालेल्या युवकाचा मृतदेह अखेर दोन दिवसांनी सापडला. कुडाळ, पिंगुळी येथील दिगंबर प्रकाश वाळके (वय २९) हा बुधवारी (दि.२६) नदी पात्रात बुडालेला होता. आज, शुक्रवारी सकाळी ८.३० वाजता वाळके यांचा मृतावस्थेत आढळून आल्याची माहिती खारेपाटण पोलिस दूरक्षेत्राचे अधिकारी चंद्रकांत माने यांनी दिली.मृत दिगंबर वाळके हा आपल्या मित्रासोबत खारेपाटण शुकनदी येथे बुधवारी सायंकाळी आला होता. नदीत आंघोळ करण्यासाठी गेला असता तो पाण्यात बुडाल्याची माहिती त्याचा ठेकेदार मित्र राहुल महादेव वाघ (रा. कर्जत, अहमदनगर) यांनी पोलिसांनी दिली होती. स्थानिक ग्रामस्थ व पोलिसांच्या मदतीने गेले दोन दिवस नदीत शोध मोहीम राबविण्यात आली होती. अखेर आज त्याचा मृतदेह सापडला.दरम्यान, शोध घेण्यासाठी पोलिसांनी स्पीड बोटचा वापर करून नदी पात्र शोधून काढले. तसेच मालवण येथील स्कुबा डायव्हींगचे पथकदेखील गुरूवारी सायंकाळी खारेपाटण आले होते. यामध्ये वैभव खोबरेकर, नुपूर तारी, सूजित मोंडकर, स्वप्नील धुरी, समीर गावकर यांचा समावेश होता. तरीही मृतदेह हाती लागला नाही.आज, शुक्रवारी ८.३० च्या दरम्यान नदीपात्रात कोंडवाडी धारणाजवळ मृतदेह आढळून आला. यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी कणकवली उपजिल्हा रुग्णालय येथे पाठविण्यात आला. त्यानंतर नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार आहे. याबाबत आधिक तपास खारेपाटण पोलिस दुरक्षेत्राचे अधिकारी चंद्रकांत माने व मोहिते करीत आहेत.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गdrowningपाण्यात बुडणेDeathमृत्यू