शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या आवारात भाजपची दोन दिवसांची कार्यशाळा; PM मोदी शेवटच्या रांगेत...
2
जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा राजीनामा देण्याच्या तयारीत! का घेतला मोठा निर्णय?
3
कॅन्सरचे रुग्ण बरे होणार? रशियाच्या लसीने सर्व अडथळे पार केले; एका मंजुरीनंतर रुग्णांना मिळणार
4
लाल समुद्रात इंटरनेटची केबल तुटली; भारत-पाकिस्तानसह आशियातील अनेक देशांना फटका
5
टिंडरवरच्या मैत्रिणीला भेटायला गेला अन् तरुणासोबत मोठा गेम झाला! पोस्ट लिहीत म्हणाला...
6
आज रात्री किती वाजता दिसणार चंद्रग्रहण, कधी असेल ग्रहणाचा स्पर्श, मध्य आणि मोक्षकाळ, जाणून घ्या  
7
रात्री Wifi बंद करायला हवं का? ९९% लोकांना माहित नाहीत फायदे, समजल्यावर तुम्हीही...
8
मिनेसोटात हेलिकॉप्टरचा भीषण अपघात, एअरपोर्टजवळ 'आर६६' हेलिकॉप्टर जळून खाक; प्रवाशांचा मृत्यू
9
रशियाने कीववर ड्रोन आणि क्षेपणास्त्रे डागली, कॅबिनेट इमारतीतून धूर निघाला; हल्ल्यात दोघांचा मृत्यू
10
"पुढच्या वर्षी सुनेला घेऊनच विसर्जनाला येणार...", लेकाच्या लग्नाला आदेश बांदेकरांचा ग्रीन सिग्नल
11
सोने खरेदीचा विचार करताय? थांबा! सोन्याने गाठला नवीन उच्चांक, आठवड्यात ३,९०० रुपयांची वाढ
12
पितृपक्ष संकष्ट चतुर्थी २०२५: मृत्यू पंचकाचे विघ्न दूर होणार, गणपती शुभ करणार; ५ गोष्टी करा!
13
गरिबीचं भीषण वास्तव! खाण्यासाठी पैसे नव्हते, जन्मदात्या आई-वडिलांनी मुलाला ५० हजारांना विकलं
14
खग्रास चंद्रग्रहण २०२५: गर्भवती महिलांनी ग्रहण पाहणे अशुभ असते का? पाहा, नियम अन् मान्यता
15
पर्थमध्ये पारंपरिक उत्साहात साजरा झाला गणोशोत्सव; मराठी संस्कृतीचे जतन, एकरुपतेचे होते यथार्थ दर्शन
16
पितृपक्ष २०२५: अत्यंत प्रभावी ८ मंत्र, श्राद्ध विधी करताना म्हणा; पितरांच्या कृपेचे धनी व्हा!
17
डोक्यावर मारला रॉड, चादरीत गुंडाळला मृतदेह अन्...; तिसऱ्या बायकोनं प्रियकरासोबत मिळून केलं कांड!
18
'अमेरिकेने आपल्यावर ५० % कर लादला, भारताने ७५ % लादावा', केजरीवालांचे केंद्राला आवाहन
19
हृतिक रोशनची ही हीरोईन वयाच्या ३९ व्या वर्षीच बनली होती आजी, एकेकाळी रंगली होती अफेअरची चर्चा
20
एस्ट्रोनॉमर कंपनीच्या एक्स एचआर प्रमुख कॅबोट यांनी घटस्फोटसाठी अर्ज केला; सीईओ सोबत डान्सचा व्हिडीओ व्हायरल झाला होता

बॉम्बे रक्तगटाचा रक्तदाता ठरला महिला रुग्णासाठी देवदूत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 18:33 IST

Blood Sindhudurg : गतवर्षी विशाखापट्टणम् येथील बॉम्बे रक्तगटाच्या रुग्णाचे प्राण वाचविणाऱ्या मालवण येथील पंकज गावडे या युवकाने आणखी एका महिलेचे रक्तदान करून प्राण वाचविले. हिवाळे (ता. मालवण) येथील लक्ष्मी नारायण गावडे या महिलेला अतिदुर्मीळ अशा बॉम्बे रक्तगटाची गरज असल्याचे समजताच पंकज याने तातडीने पडवेतील लाईफटाईम रुग्णालयात धाव घेत रक्तदान केले. बॉम्बे ब्लड ग्रुप या अतिदुर्मीळ रक्तगटाचे दहा लाखांमध्ये ४ रक्तदाते सापडतात.

ठळक मुद्देबॉम्बे रक्तगटाचा रक्तदाता ठरला महिला रुग्णासाठी देवदूत पंकज गावडेचे रक्तदान : सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानचा पुढाकार

मालवण : गतवर्षी विशाखापट्टणम् येथील बॉम्बे रक्तगटाच्या रुग्णाचे प्राण वाचविणाऱ्या मालवण येथील पंकज गावडे या युवकाने आणखी एका महिलेचे रक्तदान करून प्राण वाचविले. हिवाळे (ता. मालवण) येथील लक्ष्मी नारायण गावडे या महिलेला अतिदुर्मीळ अशा बॉम्बे रक्तगटाची गरज असल्याचे समजताच पंकज याने तातडीने पडवेतील लाईफटाईम रुग्णालयात धाव घेत रक्तदान केले. बॉम्बे ब्लड ग्रुप या अतिदुर्मीळ रक्तगटाचे दहा लाखांमध्ये ४ रक्तदाते सापडतात.लक्ष्मी गावडे यांना हिमोग्लोबीनच्या कमतरतेमुळे रक्ताची गरज होती. त्यांची रक्तपेढीचे तंत्रज्ञ सुमित मुकादम, श्रध्दाली बिले, वरदा गाडगीळ यांनी रक्त नमुन्याची सखोल तपासणी केली असता, ही रुग्ण बॉम्बे रक्तगटाची असल्याचे निदर्शनास आले. यावेळी डॉ. बावणे यांनी सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानचे सचिव किशोर नाचणोलकर आणि अमेय मडव यांच्या माध्यमातून रक्तदाते पंकज गावडे याच्याशी संपर्क केला.

पंकज हा तत्काळ सिंधु रक्तमित्रचे अध्यक्ष प्रकाश तेंडोलकर आणि कुडाळ-वेंगुर्ला विभागीय संघटक यशवंत गावडे यांच्यासोबत रुग्णालयात पोहोचले. रक्ताच्या सर्व अत्यावश्यक तपासण्या झाल्यानंतर पंकज गावडे यांनी अमूल्य आणि सर्वात दुर्मीळ असे रक्तदान केले. त्यानंतर त्या रुग्णासह नातेवाईकांची सिंधु रक्तमित्रच्या टीमने प्रत्यक्ष भेट घेऊन धीर दिला. यावेळी किशोर नाचणोलकर, डॉ. आर. एस. कुलकर्णी, डॉ. गोपाल, डॉ. आविष्कार, रक्तपेढी कर्मचारी आदी उपस्थित होते.ऑक्टोबर २०२० मध्ये पंकज गावडे यांचे बॉम्बे रक्तगटाचे रक्त विशाखापट्टणम् येथे रवाना करून तेथील रुग्णाचे प्राण वाचविले होते. जिल्ह्यामध्ये बॉम्बे ब्लड ग्रुपच्या रुग्णाला देण्यात आलेले हे पहिलेच रक्तदान आहे. त्यामुळे रुग्णाला कुठेही न हलवता किंवा रक्तदात्याला जिल्ह्याबाहेरून न आणता यशस्वीरित्या पंकज यांच्या रूपाने रक्तदान केले. 

टॅग्स :Blood Bankरक्तपेढीsindhudurgसिंधुदुर्ग