रक्तदानाचा उपक्रम कौतुकास्पद

By Admin | Updated: July 2, 2016 23:17 IST2016-07-02T23:17:41+5:302016-07-02T23:17:41+5:30

संभाजी शिंदे : ‘लोकमत’ने सामाजिक बांधिलकी जपली

Blood Donation Incredible | रक्तदानाचा उपक्रम कौतुकास्पद

रक्तदानाचा उपक्रम कौतुकास्पद

कणकवली : स्वर्गीय जवाहरलालजी दर्डा यांनी महाराष्ट्रात लावलेल्या ‘लोकमत’ च्या रोपट्याचे आता वटवृक्षात रूपांतर झाले आहे. सामाजिक, शैक्षणिक, शेती विषयक सर्व प्रश्नांना न्याय देऊन ‘लोकमत’ घराघरात पोहोचला आहे. राज्यात सर्वत्र सध्या अपुरा रक्तपुरवठा आहे. रक्ताची गरज ओळखून जवाहरलालजी दर्डा यांच्या जयंती दिनानिमित्त शनिवारी कणकवलीत घेतलेल्या रक्तदान शिबिराचा उपक्रम कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन कणकवली कॉलजचे प्राचार्य संभाजी शिंदे यांनी बोलताना केले.
दरम्यान, ‘लोकमत’ने राज्यभर व गोवा राज्यात गुरुवारी घेतलेल्या शिबिरात शेकडो जणांनी रक्तदान केले. स्वातंत्र्य संग्राम सेनानी श्रद्धेय जवाहरलालजी दर्डा यांच्या पुण्यस्मरणानिमित्त येथील एच. पी. सी. एल. सभागृहात रक्तदान शिबिर शनिवारी पार पडले. या शिबिराचे उद्घाटन प्राचार्य शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी मार्गदर्शन करताना प्राचार्य संभाजी शिंदे बोलत होते. ‘लोकमत’ने सामाजिक बांधिलकी कायमच जपली आहे. त्याचा प्रत्यय आल्याचे ते म्हणाले. यावेळी जिल्हा व्यापारी महासंघाचे सचिव महेश नार्वेकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश पालव, अधि परिचारीका हेमांगी रणदिवे, वैद्यकीय समाजसेवक किशोर नांदगावकर, परिचर उल्हास राणे, परिचर सुरेश डोंगरे, नितीन गावकर ‘लोकमत’चे आवृत्तीप्रमुख महेश सरनाईक आणि ‘लोकमत’ परिवारातील लक्ष्मण आडाव, भालचंद्र पेडणेकर, महेंद्र पिळणकर, विवेक राणे, चित्तरंजन जाधव, संदीप गावडे, सुधीर राणे, विजयकुमार शिंदे, तानाजी आयवाळे, सुर्यकांत मालवणकर, संजय एकावडे, रूपेश येंडे आदी उपस्थित होते. महेश नार्वेकर, प्रा. दिवाकर मुरकर यांनी ‘लोकमत’च्या उपक्रमाचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या. (वार्ताहर)
२0 जणांचे रक्तदान
४कणकवली येथे ‘लोकमत’ ने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात पोलिस कर्मचारी, महाविद्यालयीन विद्यार्थी, स्थानिक नागरिक मिळून २0 जणांनी रक्तदान केले. हे शिबिर यशस्वी होण्यासाठी कणकवली शिक्षण प्रसारक मंडळाचे सहकार्य लाभले.

Web Title: Blood Donation Incredible

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.