चुलत आजोबांचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2016 00:17 IST2016-05-08T00:17:27+5:302016-05-08T00:17:27+5:30

नातवाला अटक

The blood of cousin grandfather | चुलत आजोबांचा खून

चुलत आजोबांचा खून

राजापूर : जमिनीच्या वादातून नातवानेच चुलत आजोबांच्या डोक्यात लोखंडी पहार घालून खून केल्याची खळबळजनक घटना तालुक्यातील आंगले गावात घडली. अनाजी भानू राऊत (वय ७०) असे आजोबांचे नाव आहे. पोलिसांनी आरोपी देवेंद्र बबन राऊत (२३) याला अटक केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून देवेंद्र आणि अनाजी राऊत यांच्यामध्ये जमिनीवरून वाद होता. शुक्रवारी सकाळी अनाजी यांची पत्नी भागीरथी या नेहमीप्रमाणे आपल्या शेतात सकाळी आठ वाजण्याच्या दरम्यान कामासाठी गेल्या होत्या. दुपारी ११ वाजता त्या घरी परत आल्या. त्यावेळी घरात पाऊल टाकताच समोरचे दृश्य पाहून त्या घाबरून गेल्या. तेथे अनाजी रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. भागीरथी यांनी तत्काळ गावच्या सरपंच सुहानी राऊत व पोलिसपाटील सुप्रिया शिंदे यांच्याशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली.
घटनेची खबर नोंदवून घेतल्यानंतर पोलिस घटनास्थळी उशिराने दाखल झाले. दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास पोलिस रुग्ण्वाहिकेसह गावात आले. त्यांनी जखमी अनाजी यांना राजापूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले, मात्र या दरम्यान बराच उशीर झाल्याने अनाजी यांना वाचविण्यात अपयश आले. पोलिसांनी आरोपी देवेंद्र याला तत्काळ अटक केली असून, त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याने गुन्हा करताना वापरलेली पहारही जप्त करण्यात आली आहे. राजापूरचे पोलिस उपनिरीक्षक सचिन काळे, श्रीमती फाळके, प्रसाद शिवलकर, चाटे, चव्हाण हे घटनास्थळी गेले होते.

Web Title: The blood of cousin grandfather