शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ताधारी, निवडणूक आयोगाने देशाला फसवले; संपूर्ण निवडणूक प्रणालीची झाली चोरी; राहुल गांधी यांचा आरोप
2
निवडणूक प्रक्रियेत मोठा घोटाळा! 'या' पाच प्रकारे झाली ‘मतांची चोरी’, राहुल गांधींचा दावा; विचारले असे प्रश्न
3
आजचे राशीभविष्य, ०८ ऑगस्ट २०२५: पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, सुख-सुबत्ता, कल्याणाचा दिवस
4
अमेरिकेत महागाईचा भडका; टॅरिफमुळे भारतीय वस्तूंवर लावलेले ५०% आयात शुल्क ग्राहकांना भोवणार
5
रेव्ह पार्टीत नशा देऊन महिलांवर लैंगिक अत्याचार, प्रांजल खेवलकर अडचणीत; मोबाइलमध्ये सापडला अश्लील छायाचित्रांचा साठा!
6
मला व्यक्तिश: खूप मोठी किंमत चुकवावी लागणार आहे, नेमकं काय म्हणाले मोदी?
7
गजलक्ष्मी सौभाग्य योगात रक्षाबंधन: ५ मूलांक लकी, बंपर कमाई; प्रसन्न होईल लक्ष्मी, शुभच घडेल!
8
रक्षाबंधन २०२५: गणपती, स्वामींना राखी नक्की बांधा; सदैव रक्षण-कृपा, कायम सोबत असतील स्वामी!
9
उत्तरकाशीच्या धरालीत १००हून अधिक लोक बेपत्ता; ४०० जणांना वाचवले, ३०० यात्रेकरू सुरक्षित
10
कबुतरखान्यात दाणे टाकण्यावर हायकोर्टाची बंदी कायम, हटविण्यास उच्च न्यायालयाचा नकार
11
न्या. वर्मा यांचे वर्तन विश्वासार्ह नाही; महाभियोगाची शिफारस रद्द करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार 
12
Isro Dharali Photos: गाव नाही, भगीरथी नदीही गिळली; बघा ISROच्या सॅटेलाईटने टिपलेले फोटो, किती झालाय विध्वंस
13
डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर टॅरिफ बॉम्ब! चीनने चढवला हल्ला; म्हणाला, 'हा टॅरिफचा दुरुपयोग'
14
Kenya Plane Crash: घरांवरच कोसळले वैद्यकीय पथकाला घेऊन जाणारे विमान; २ डॉक्टरसह ६ जण ठार
15
‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान
16
सिनेमाचं आमिष, पार्ट्यांचा बहाणा...;खेवलकरच्या मोबाईलमध्ये १७०० अश्लील फोटो अन् व्हिडिओ, महिलांची तस्करी उघड
17
शालार्थ आयडी घोटाळा: राज्य शासनाची ‘एसआयटी’ गठीत, पुणे विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वात तीन सदस्यीय समिती करणार तपास
18
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
19
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
20
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...

आंबोलीतील मलई पठाराला झळाळी येणार्

By admin | Updated: January 2, 2017 23:43 IST

$िंवनविभागाकडून आराखडा तयार : उंच मनोऱ्याबरोबरच लाकडी माच, मातीचे रस्ते बनविणार

अनंत जाधव ल्ल सावंतवाडीपर्यटन दृष्ट्या आंबोलीला समृध्द करण्यमासाठी आंबोली चौकुळ रस्त्यावरील मलई पठाराला नवी झळाळी देण्याचा निर्णय वनविभागाने घेतला आहे. या मलई पठारावर वनविभाग उंच मनोरे, लाकडी माच, मातीचे रस्ते तयार करणार आहे. या कामाचा आराखडा तयार करण्यात आला असून, यासाठी जिल्हा नियोजन विभाग निधी देणार आहे.आंबोलीची ओळख ही धबधब्यामध्ये होती. ही ओळख कामय ठेवत वनविभागाने आंबोलीचा पर्यटन दृष्ट्या विकास करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात आंबोलीच्या भौगोलिक रचनेचा वापर करून घेण्यात आला आहे. आंबोली-चौकुळ रस्त्यावर मलई पठार नावाचे पूर्वीपासून क्षेत्र आहे. मात्र, हा पठार विकासाच्या प्रकियेत आणण्याबाबत कुणाच्याच लक्षात आले नव्हते. प्रथमच वनविभागाने यासाठी पुढाकार घेतला आहे.मलई पठाराचा काही भाग हा घनदाट जंगलाने व्यापला आहे. या भागात विविध प्राणी आहेत. यात वाघ, हरीण, सांबर, अस्वल आदींचा समावेश आहे. तर आंबोलीत गवारेड्यांचे प्रमाण अधिक असून, या पठारावर तर सायंकाळी हमखास हे प्राणी दिसतात. त्यामुळे याठिकाणी डिसेंबर ते मे महिन्याच्या कालावधीत अनेक पर्यटक येत असतात. दिवसेंदिवस पर्यटकांची संख्याही वाढत जात आहे. या परिसराचा विकास झाल्यास येथे पर्यटक थांबू शकेल, असे वाटत असल्यानेच वनविभागाने हे मलई पठार विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे.या मलई पठाराचा विकास करीत असताना मुंबई, पुणे, गोवा येथील पर्यटकांना ग्रामीण रचेनेचे खास आकर्षण असल्याने या ठिकाणी वनविभाग कच्चे मातीचे रस्ते बनविणार आहे. तसेच उंच उंच मनोरेही उभारणार आहे. जेणे करून येणारा पर्यटक वर चढून परिसराचे छायाचित्र काढू शकतो. तसेच लाकडी माच उभारण्यात येणार आहेत. या माचांवर पर्यटक काही काळ थांबू शकतो. या शिवायही अन्य काही बाबींचा समावेश यात करण्यात येणार आहे. त्यांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. या आराखड्याला वनविभागाच्या वरिष्ठ कार्यालयाची अद्याप मंजुरी मिळाली नाही. मात्र, ती लवकरच मिळेल अशी आशा आहे.त्यानंतर जिल्हा नियोजन विभागातून या कामाला निधी मिळणार आहे. सध्या तरी या कामाला आराखड्याप्रमाणे १० लाखापर्यंतचा खर्च अपेक्षित आहे. मात्र, या आराखड्यात बदल झाला तर निधी वाढू शकतो, असे वनविभागाचे म्हणणे आहे. मलई पठार विकसित झाले की येणाऱ्या पर्यटकांसाठी तिकीट लावायचे की नाही, याचा निर्णय मात्र अद्यापपर्यंत वनविभागाने घेतला नाही.