स्त्री भ्रूण हत्येला वेळीच आळा घाला
By Admin | Updated: September 2, 2014 23:18 IST2014-09-02T23:12:06+5:302014-09-02T23:18:23+5:30
मीना जोशी यांचे प्रतिपादन

स्त्री भ्रूण हत्येला वेळीच आळा घाला
सावंतवाडी : पारंपरिक रुढी, प्रथा, रिवाज यांच्या पगड्यामुळे दिवसेंदिवस स्त्री-भ्रूण हत्या वाढत चालली आहे. या वाईट प्रथेला वेळीच आळा घालणे जरुरीचे आहे, असे मत डॉ. मीना जोशी यांनी व्यक्त केले.
रोटरी क्लब आॅफ सावंतवाडीच्यावतीने येथील श्री पंचम खेमराज महाविद्यालयात स्त्री-भ्रूण प्रतिबंधक जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला. महाविद्यालयाच्या जिमखाना हॉलमध्ये झालेल्या या कार्यक्रमावेळी डॉ. मीना जोशी बोलत होत्या. याप्रसंगी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. ज्ञानेश्वर दुर्भाटकर उपस्थित होते.
डॉ. दुर्भाटकर यांनी विद्यार्थ्यांना ‘स्त्री-भू्रण हत्या-एक पाप’ या शिर्षकाखालील सीडी पडद्यावर दाखविली. तसेच या विषयावर मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमावेळी सावंतवाडी रोटरी क्लबचे अध्यक्ष मंगेश गोवेकर, डॉ. राजेश नवांगुळ, आनंद रासम, जयप्रकाश वाळके, श्रीराम गावडे, रसायनशास्त्र विभागप्रमुख गोडकर, एनएसआयचे समन्वयक प्रा. डी. बी. शिंदे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक रोटरी क्लबचे अध्यक्ष मंगेश गोवेकर, आभार रोटरीचे सुनील सावंत यांनी मानले. या कार्यक्रमाला एनएसआय विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी एनएसआयचे विद्यार्थी प्रतिनिधी राधा बर्वे, अंकिता परब यांनी विशेष परिश्रम घेतले. (वार्ताहर)