शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या मुंबईतील बैठकीला भाजप कार्यकर्त्यालाच पाठविले? फोटो समोर आल्याने उडाली खळबळ...
2
पाकिस्तानला मोठा झटका देण्याच्या तयारीत अफगाणिस्तान, करणार तगडा प्रहार; भारतही देणार साथ!
3
'काँग्रेसमुळे जम्मू-काश्मीरचा एक भाग पाकिस्तानात गेला', पंतप्रधान मोदींचा घणाघात...
4
दरमहा लाखोंची कमाई; तरीही महिन्याच्या शेवटी खर्चाला पैसे उरत नाही? आर्थिक तज्ञांनी सांगितलं खरं कारण
5
लिव्ह-इन पार्टनरच्या सांगण्यावरून रुग्णालयातून बाळ चोरलं, पण परत येताना रस्ताच विसरली! आणखी एक चूक केली अन्...
6
"रोहित आर्यने जो मार्ग स्वीकारला तो चुकीचा, पण..." काँग्रेसचे उपस्थित केले गंभीर प्रश्न
7
"मी मालिकेत येईन पण...", शिल्पा शिंदे 'भाभीजी घर पर है'मध्ये कमबॅक करणार? दिली प्रतिक्रिया
8
Mumbai Local Train Update: वांगणी-शेलू स्थानकादरम्यान मालगाडीच्या इंजिनात बिघाड; CSMT कडे जाणारी लोकलसेवा ठप्प
9
World Cup 2025 FINAL: टीम इंडियाला नडू शकते आफ्रिकन कर्णधार लॉरा वोल्वार्ड, जाणून घ्या रेकॉर्ड
10
भयानक! 'तो' वाद टोकाला गेला! बायकोने फेसबुक वापरल्याने नवरा संतापला, थेट जीवच घेतला
11
५ वर्षांसाठी ₹१० लाखांचं कार लोन घेतल्यास कोणत्या बँकेत किती पडेल EMI? पाहा संपूर्ण गणित
12
७-८ नव्हे तर 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमा बनवण्यासाठी लागले तब्बल 'इतके' कोटी; महेश मांजरेकर म्हणाले- "बजेट वाढलं कारण..."
13
पृथ्वीच्या 'महाविनाशा'चा धोका टळला? शास्त्रज्ञांचा नवीन अभ्यास समोर आला...
14
सोने महागले! मागणी १६% ने घटली; लोक आता ज्वेलरीपेक्षा 'या' फॉर्ममध्ये करतायेत मोठी गुंतवणूक
15
जेमिमा रॉड्रीग्ज, गौतम गंभीर अन् माखलेली जर्सी... १४ वर्षांपूर्वीचा भारताचा 'विजयी' योगायोग
16
नोव्हेंबरमध्ये जन्मलेल्या व्यक्ती म्हणजे प्रेमाचा सागर, पण पोटात ज्वालामुखी; वाचा गुण दोष!
17
Rakhi Sawant : "मी दोन्ही किडन्या विकल्या, सलमानसाठी सोन्याची अंगठी घेतली"; राखी सावंतचा धक्कादायक दावा
18
सौदी अरेबियाने घेतला मोठा निर्णय! लाखों भारतीय मुस्लिमांवर होणार थेट परिणाम; नेमकं प्रकरण काय?
19
ट्रम्पना ठेंगा! भारतात परत येतेय 'ही' ऑटो कंपनी; ४ वर्षांपूर्वी बंद केलेली फॅक्ट्री परत होणार सुरू
20
वेगाची राणी...! महाराष्ट्राची लेक, डायना पंडोले इतिहास रचणार; फेरारी क्लब चॅलेंजमध्ये भाग घेणारी पहिली भारतीय महिला रेसर

दोडामार्गमध्ये भाजपाचे रास्तारोको आंदोलन, बांधकाम उपअभियंता धारेवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2020 15:10 IST

dodamarg, highway, pwd, sindhudurg, bjp दोडामार्ग तालुक्यातील राज्यमार्ग दुरुस्तीसंदर्भात करण्यात आलेल्या छोट्या-मोठ्या आंदोलनांंना बांधकाम विभागाने केराची टोपली दाखविली. त्यामुळे, आघाडी सरकार व शासनाविरोधात संतप्त झालेल्या दोडामार्ग भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी सासोली येथे मोठ्या संख्येने एकत्र येत रास्तारोको आंदोलन केले.

ठळक मुद्देदोडामार्गमध्ये भाजपाचे रास्तारोको आंदोलन, बांधकाम उपअभियंता धारेवर ३० नोव्हेंबरपर्यंत रस्ता सुस्थितीत करण्याच्या लेखी पत्रानंतर स्थगित

दोडामार्ग : तालुक्यातील राज्यमार्ग दुरुस्तीसंदर्भात करण्यात आलेल्या छोट्या-मोठ्या आंदोलनांंना बांधकाम विभागाने केराची टोपली दाखविली. त्यामुळे, आघाडी सरकार व शासनाविरोधात संतप्त झालेल्या दोडामार्ग भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी सासोली येथे मोठ्या संख्येने एकत्र येत रास्तारोको आंदोलन केले.यावेळी बांधकाम उपअभियंता चव्हाण यांना धारेवर धरले. ठेकेदाराशी असलेल्या साटेलोट्यामुळे रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. तुम्ही जनतेचा जीव धोक्यात घालत आहात. तुमची मुजोरगिरी खपवून घेणार नाही अशा शब्दांत कानउघाडणी केली. त्यावेळी ३० नोव्हेंबरपर्यंत रस्ते व्यवस्थित करण्यात येतील, असे लेखी पत्र उपअभियंत्यांनी दिले. दिलेल्या तारीखपर्यंत हे आंदोलन स्थगित करीत असून रस्त्याचे काम पूर्णत्वास गेले नाही तर खासदार नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली भव्य आंदोलन छेडू, असा ईशारा भाजपच्यावतीने देऊन आंदोलन स्थगित करण्यात आले.या राज्यमार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य आहे. चाळण झालेल्या रस्त्यावरून वाहतूक करताना वाहनचालक त्रस्त होतात. सर्वसामान्यांचा आवाज राज्य शासनापर्यंत पोहोचविण्यासाठी भाजपाने बुधवारी सासोली येथे रास्तारोको आंदोलन केले.यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष व भाजप उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी, माजी तालुकाध्यक्ष सुधीर दळवी, संतोष नानचे, रमेश दळवी, विलास सावंत, सूर्यकांत गवस, अजय परब आदींसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी प्रशासनाकडून पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला होता. बांदा पोलीस निरीक्षक अनिल जाधव, दोडामार्ग प्रभारी पोलीस निरीक्षक कुलदीप पाटील, सावंतवाडी सहाय्यक पोलीस निरीक्षक यादव, राखीव नियंत्रण दल मिळून सुमारे ५० ते ६० कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.गोव्याच्या रस्त्याने येतात; लाज वाटली पाहिजेसिंधुदुर्ग जिल्ह्याचे खासदार, पालकमंत्री, आमदार दोडामार्ग तालुक्यात येताना बांदामार्गे न येता गोव्यातून येतात. मात्र, सामान्य जनता कसा जीवघेणा प्रवास करते हे आजमावत एक लोकप्रतिनिधी म्हणून त्याची तरी लाज बाळगा. हे अपयशी सरकार जनतेच्या हिताचे नाही. म्हणून तिघाजणांनी मुंडण केले. कोविडच्या नावाखाली निधी गिळंकृत करून पुढच्या मतदानाची तयारी करीत आहेत, असा टोला एकनाथ नाडकर्णी यांनी लगावला आहे.जिल्हाधिकाऱ्यांनी दुचाकीवरून फिरणेरस्त्यासंदर्भात बुधवारी भाजपचे आंदोलन आहे हे आठ दिवसांपूर्वी जाहीर झाले होते. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक नेमकी आंदोलनादिवशी ठेवली. हे पूर्वनियोजित अधिकाऱ्यांंचे घोटाळे दडपण्यासाठी करण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांनी चारचाकी गाडीत बसून न फिरता दुचाकीने दोडामार्ग तालुक्याचा प्रवास करावा. तेव्हाच सामान्यांचे दुखणे समजेल, असे म्हापसेकर म्हणाले.भाजप अंतर्गत वाद अद्याप कायमतालुक्यातील रस्ते सुव्यवस्थित करण्यासंदर्भात भाजपच्यावतीने बुधवारी मोठ्या प्रमाणात रास्तारोको करण्यात आले. मात्र, या आंदोलनात भाजपचा दुसरा गट सहभागी झाला नव्हता. यावेळी आंदोलनस्थळी माजी पदाधिकाऱ्यांंनी नाराजी व्यक्त केली. परंतु एकंदरीत या प्रकारावरून तिढा सुटला नसून अजूनही आहे हे उघड झाले. महिन्याभरापूर्वी भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी तालुक्यातील कार्यकर्त्यांमधील तिढा सुटल्याचे जाहीत केले होते. जो गट या आंदोलनात सहभागी झाला नाही. त्या गटाने आपल्याला या आंदोलनापासून अलिप्त ठेवण्यात आले असल्याचे यावेळी स्पष्ट केले. त्यामुळे वाद वाढण्याची चिन्हे दिसत आहेत. 

टॅग्स :pwdसार्वजनिक बांधकाम विभागhighwayमहामार्गroad safetyरस्ते सुरक्षाsindhudurgसिंधुदुर्ग