कणकवलीत भाजपाचा जल्लोष

By Admin | Updated: October 31, 2014 23:31 IST2014-10-31T23:28:42+5:302014-10-31T23:31:14+5:30

कणकवली : मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आणि भाजपाच्या मंत्र्यांचा शपथविधी झाल्यानंतर

BJP's jolt at Kankavali | कणकवलीत भाजपाचा जल्लोष

कणकवलीत भाजपाचा जल्लोष

कणकवली : मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आणि भाजपाच्या मंत्र्यांचा शपथविधी झाल्यानंतर शहरात भाजपातर्फे जल्लोष साजरा करण्यात आला.
येथील माजी आमदार प्रमोद जठार कार्यालय आणि मुख्य चौकात कार्यकर्त्यांनी फटाके फोडून घोषणा दिल्या. तसेच शहरातून दुचाकीवरून रॅली काढण्यात आली. तसेच कार्यकर्त्यांमध्ये मिठाई वाटून आनंद साजरा करण्यात आला. यावेळी महिला जिल्हाध्यक्ष राजश्री धुमाळे, तालुकाध्यक्ष शिशीर परूळेकर, सरचिटणीस परशुराम झगडे, रवि शेटये, भाऊ राणे, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष संतोष पुजारे, महिला युवा मोर्चा तालुकाध्यक्ष संचिता परब, ग्रामपंचायत सदस्य प्रदीप गावडे, समर्थ राणे, नितिन मेस्त्री, बबली राणे आदी उपस्थित होते.
जिल्ह्याचा सुपुत्र कॅबिनेटमध्ये
देवगडमधील कुणकवणचे सुपुत्र आमदार विनोद तावडे यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली. तावडे यांना मंत्रीपद मिळाल्याने सिंधुदुर्ग जिल्हावासीयांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
पालकमंत्री कोण?
जिल्ह्याचा पालकमंत्री कोण होणार यावरून तर्कवितर्क लढविण्यात येत आहेत. युती होणे न होणे यावर पालकमंत्रीपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडेल, याची समीकरणे बदलणार आहेत. सेनेशी युती झाल्यास आमदार दीपक केसरकर किंवा वैभव नाईक यांच्याकडे ही जबाबदारी जाऊ शकते. (प्रतिनिधी)

Web Title: BJP's jolt at Kankavali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.