शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

तेराही ग्रामपंचायतींवर भाजपचा झेंडा फडकविणार : नासीर काझी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 18:53 IST

gram panchayat Election Bjp Sindhudurg- निवडणूक होण्यापूर्वीच भाजपचे २८ सदस्य बिनविरोध निवडून आले असून, मांगवली आणि वेंगसर या दोन ग्रामपंचायती भाजपच्या ताब्यात आल्या आहेत. निवडणुकीपर्यंत भाजपचा आलेख चढताच राहणार असून, तेराही ग्रामपंचायतींवर भाजपचा झेंडा फडकेल, असा विश्वास भाजपचे तालुकाध्यक्ष नासीर काझी यांनी व्यक्त केला.

ठळक मुद्देतेराही ग्रामपंचायतींवर भाजपचा झेंडा फडकविणार : नासीर काझी मांगवली, वेंगसर ग्रामपंचायतींवर केला दावा

वैभववाडी : निवडणूक होण्यापूर्वीच भाजपचे २८ सदस्य बिनविरोध निवडून आले असून, मांगवली आणि वेंगसर या दोन ग्रामपंचायती भाजपच्या ताब्यात आल्या आहेत. निवडणुकीपर्यंत भाजपचा आलेख चढताच राहणार असून, तेराही ग्रामपंचायतींवर भाजपचा झेंडा फडकेल, असा विश्वास भाजपचे तालुकाध्यक्ष नासीर काझी यांनी व्यक्त केला.येथील भाजप कार्यालयात त्यांची पत्रकार परिषद झाली. यावेळी पंचायत समिती सदस्य अरविंद रावराणे, माजी उपसभापती भालचंद्र साठे, किशोर दळवी, अनंत फोंडके आदी उपस्थित होते.काझी म्हणाले, तालुक्यातील १३ ग्रामपंचायतींची निवडणूक १५ जानेवारीला होणार आहे. परंतु निवडणूक निकालापूर्वीच भाजपच्या विजयाची श्रुंखला सुरू झाली आहे. तालुक्यातील १०३ पैकी २८ जागा बिनविरोध आल्या असून, त्या भाजपच्या आहेत. मांगवली ग्रामपंचायतीची निवडणूक पूर्णपणे बिनविरोध झाली असून ती भाजपच्या ताब्यात आली आहे.

वेंगसर ग्रामपंचायतीच्या सातपैकी सहा जागांची निवड बिनविरोध झाली असून, त्या सर्व जागा भाजपच्या आहेत. त्यामुळे निवडणुकीपूर्वीच दोन ग्रामपंचायतींवर भाजपचा झेंडा फडकला आहे. निवडणूक अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख ४ जानेवारी असून, त्या तारखेपर्यंत भाजपच्या आणखी काही जागा बिनविरोध होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. उर्वरित ११ ही ग्रामपंचायतींवर येत्या काळात भाजपचेच वर्चस्व दिसून येणार आहे.पक्षाच्या लोकाभिमुख धोरणामुळे विरोधी पक्षात काम करणाऱ्या अनेकांना भाजपचे आकर्षण आहे. निवडणुकीला इतर पक्षातून उभे राहिलेले अनेक कार्यकर्ते पक्षात प्रवेश करण्यास उत्सुक आहेत. परंतु आमच्या पक्षाचे पॅनेल त्या गावात असल्यामुळे तूर्तास त्यांचा प्रवेश घेण्यास अडचण झालेली आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.धमक्यांना घाबरत नाहीकाही गावांमध्ये उमेदवारी अर्ज भरणाऱ्या महिला उमेदवारांना विरोधकांकडून धमक्या दिल्या जात आहेत. त्यामुळे धमक्या देणाऱ्यांविरोधात पोलिसांत तक्रार दिली जाणार आहे. आम्ही कुणाच्याही धमक्यांना भीक घालत नाही. कारण आमचे नेतृत्व सक्षम आहे, असे मत नासीर काझी यांनी व्यक्त केले.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूकBJPभाजपाsindhudurgसिंधुदुर्ग