यापुढे भाजप सर्व निवडणुका लढविणार

By Admin | Updated: August 24, 2014 00:50 IST2014-08-24T00:47:06+5:302014-08-24T00:50:57+5:30

अतुल काळसेकर यांची माहिती

BJP will now fight all the elections | यापुढे भाजप सर्व निवडणुका लढविणार

यापुढे भाजप सर्व निवडणुका लढविणार

वेंगुर्ले : येत्या विधानसभेच्या निवडणुकीत भाजप आपला उमेदवार देणार आहे. मात्र, पुढील पंचायत समिती, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत व नगरपरिषदेत भाजप उमेदवार उभा करून भाजप निवडणुका लढविणार असल्याचे जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी जाहीर केले.
वेंगुर्ले तालुका भारतीय जनता पार्टीची मासिक सभा पिराचा दर्गा येथील कार्यालयात जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी काळसेकर यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना, येत्या पंधरा दिवसात प्रत्येक बुथ गटाचे ५० सदस्य निवडून अधिकृत मान्यता मिळवून जिल्हा परिषद गटाचे मेळावे घ्यावेत. यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन भाजपने केलेले काम जनतेपर्यंत पोहोचवावे व संघटना मजबूत करावी, असे सांगितले. यावेळी भाजपमध्ये प्रवेश केलेले भाजप वेंगुर्ले शहराध्यक्ष संजय तानावडे, शिरोडा शहराध्यक्ष मनोज उगवेकर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष राजू राऊळ, मिलिंद केळूसकर, तालुकाध्यक्ष साईप्रसाद नाईक, ज्येष्ठ कार्यकर्ते प्रकाश रेगे, वसंत पालयेकर, हरेष नाईक, हरिश्चंद्र परब, लक्ष्मीकांत कर्पे, दीपक माडकर, संदीप नवार, शेखर कोयंडे, हरेश देवज, उपेंद्र वालावलकर, प्रकाश करंगुटकर, अनंत नेरूरकर, बाबा राऊत, केशव ठाकूर, दादा वाटवे, प्रशांत खानोलकर, दिनेश आचार्य, विरेंद्र सावंत आदी उपस्थित होते. आभार साईप्रसाद नाईक यांनी मानले. (प्रतिनिधी)

Web Title: BJP will now fight all the elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.