शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

..तर दीपक केसरकरांच्या कुंडल्या बाहेर काढू, भाजप प्रवक्ते संजू परबांचा इशारा 

By अनंत खं.जाधव | Updated: April 12, 2023 16:55 IST

केसरकारांना जनाची नाही, पण मनाची असेल तर त्यांनी युतीची भाषा करू नये

सावंतवाडी : काही झाले तरी मोती तलावा काठचा आठवडा बाजार हलवू देणार नाही, तसा प्रयत्न मंत्री दीपक केसरकर यांनी केल्यास त्यांच्या कुंडल्या बाहेर काढू, असा इशारा माजी नगराध्यक्ष तथा भाजप प्रवक्ते संजू परब यांनी दिला. दरम्यान मंत्री केसरकरांनी एवढा अपमान होऊन आमच्या बरोबर युती करण्यास येऊ नये पाठिंब्याशिवाय आम्ही पालिका ताब्यात घेण्यास सक्षम आहोत. त्यांची आम्हाला गरज नाही, असेही स्पष्टच सुनावले. परब यांनी आपल्या कार्यालयात पत्रकार परिषद घेत मंत्री केसरकर यांच्यावर टीका केली. यावेळी माजी नगरसेवक आनंद नेवगी, नासिर शेख, दिलीप भालेकर आदी उपस्थित होते.यावेळी बोलताना परब म्हणाले, येथील मोती तलावा काठी भरविला जाणारा आठवडा बाजार योग्यच आहे. त्याला नागरिकांची सुद्धा ना हरकत आहे. बऱ्याच नागरिकांनी हा आठवडा बाजार इतरत्र हलवू नये, अशी मागणी केली आहे. मात्र केसरकर सवयीप्रमाणे आपलं तेच खरं करण्याचा बालिश हट्ट करत असतील, तर आम्ही गप्प बसणार नाही. त्यांनी आठवडा बाजार हलवून दाखवावाच, त्यांच्या कुंडल्या बाहेर काढू, असा इशाराच त्यांनी यावेळी दिला.सावंतवाडी पालिका निवडणूक स्वबळावर लढण्याची आमची ताकद आहे. त्यामुळे केसरकारांना जनाची नाही, पण मनाची असेल तर त्यांनी युतीची भाषा करू नये, त्यांच्या पाठिंब्याशिवाय आम्ही पालिका ताब्यात घेऊन दाखवतो, असाही इशारा त्यांनी यावेळी दिला.तेलींबद्दल बोलल्यास खपवून घेणार नाहीराजन तेली भाजपचे जिल्हाध्यक्ष आहेत. कोण उठेल आणि टीका करेल तर आम्ही गप्प बसणार नाही. मंत्री केसरकर यांनी निधी आणला तर मल्टीस्पेशालिटी रूग्णालय तसेच उद्योग या जिल्ह्यात का आले नाही? नागरिक आता भूलथापांना बळी पडणार नाहीत. व्यापाऱ्यांना मोती तलावा काठी बाजार हवाजरी काही व्यापाऱ्यांकडून मोती तलावावर बाजार नको असे निवेदन देण्यात आले असले तरी ते त्याचे व्यक्तीगत मत असू शकते. पण आम्हा सर्व व्यापाऱ्यांना मोती तलावा कठीच बाजार हवा असल्याचे व्यापारी संघटना प्रतिनिधी आनंद नेवगी यांनी सांगितले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गDeepak Kesarkarदीपक केसरकर BJPभाजपा