शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Assembly Election 2019 : नारायण राणेंना भाजपने विचारमंथनाचे धडे द्यावेत : केसरकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2019 14:22 IST

नारायण राणे हे दुसऱ्यांचे पक्ष विसर्जित करण्यास निघाले होते. पण आता त्यांनाच स्वत:चा पक्ष विसर्जित करावा लागला. हा सर्व नियतीचा खेळ असून, माझी लढाई ही प्रवृत्तींशी आहे. जर भविष्यात राणेंना भाजपच्या विचारमंथन शिबिरात सहभागी करून घेतले आणि त्यांची विचारधारा बदलली तर त्यांच्याशी असलेला माझा राजकीय संघर्षही संपेल, असे मत राज्याचे गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी मांडले. ते आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

ठळक मुद्दे नारायण राणेंना भाजपने विचारमंथनाचे धडे द्यावेत : दीपक केसरकर विचारधारा बदलली तर राजकीय संघर्ष संपेल

सावंतवाडी : नारायण राणे हे दुसऱ्यांचे पक्ष विसर्जित करण्यास निघाले होते. पण आता त्यांनाच स्वत:चा पक्ष विसर्जित करावा लागला. हा सर्व नियतीचा खेळ असून, माझी लढाई ही प्रवृत्तींशी आहे. जर भविष्यात राणेंना भाजपच्या विचारमंथन शिबिरात सहभागी करून घेतले आणि त्यांची विचारधारा बदलली तर त्यांच्याशी असलेला माझा राजकीय संघर्षही संपेल, असे मत राज्याचे गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी मांडले. ते आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.यावेळी त्यांनी नारायण राणे यांनी केलेल्या टीकेलाही उत्तर दिले. मंत्री केसरकर म्हणाले, माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी अनेक पक्ष संपविण्याची घोषणा केली. शिवसेना विसर्जित करण्याची घोषणा केली. पण नियतीच्या मनात वेगळेच होते. त्यांना भाजपसारख्या पक्षात प्रवेश मिळावा म्हणून अडीच वर्षे वाट बघावी लागली. अडीच वर्षांनंतर त्यांना स्वत:चा पक्षही विसर्जित करावा लागला, यासारखे दुर्दैव ते काय? असा सवाल मंत्री केसरकर यांनी केला.जिल्ह्यातील जनता सुज्ञ आहे. तुम्ही माझ्या विरोधात काय ते एकटवा, पण सावंतवाडीत त्याचा काही उपयोग होणार नाही, असे मतही मंत्री केसरकर यांनी व्यक्त केले.माझी लढाई ही राणेंशी व्यक्तिगत नाही. कोणत्याही घटनेवरून त्यांच्या कुटुंबात, भावा-भावात वाद व्हावा ही अपेक्षा मुळीच नाही. मी कुटुंंब फोडून राजकारण करणारा नाही. सावंतवाडीत तेवढी संस्कृतता बाळगली जाते. माझी लढाई ही प्रवृत्तींशी आहे. राणे सर्वसामान्य जनतेला देत असलेल्या त्रासाविरोधात होती. पण आता ते भाजपात प्रवेश करीत आहेत.

ते भाजपचे सदस्य झाले आहेत. त्यांनी आता भाजपची विचारधारा स्वीकारावी. भाजपने त्यांना विचारमंथनाचे धडे द्यावेत. त्यातून असलेला राग नाहीसा होईल. त्यानंतरच माझा राणेंशी असलेला राजकीय संघर्ष संपेल, असे मत यावेळी मंत्री केसरकर यांनी व्यक्त केले.

टॅग्स :kankavli-acकणकवलीNitesh Raneनीतेश राणे Deepak Kesarkarदीपक केसरकर sindhudurgसिंधुदुर्ग