शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्गात भाजप-शिवसेनेत रस्सीखेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 11:37 IST

gram panchayat Election Sindhudurg- सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजप व शिवसेनेकडून पक्षवाढीसाठी जोरदार प्रयत्न सुरू असून विविध ठिकाणी पक्षप्रवेशाचे सोहळे आयोजित केले जात आहेत. त्याचबरोबर ग्रामपंचायतींवर वर्चस्व कोणाचे ? याबाबत आरोप- प्रत्यारोप रंगत आहेत. त्यामुळे एकेकाळी मित्रपक्ष असलेल्या भाजप व शिवसेनेत पक्षवाढीसाठी सध्या जोरदार रस्सीखेच सुरू असल्याचे चित्र सिंधुदुर्ग जिल्ह्यात पहायला मिळत आहे.

ठळक मुद्देसिंधुदुर्गात भाजप-शिवसेनेत रस्सीखेचइतर पक्षांचे कार्यकर्ते नाराज

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजप व शिवसेनेकडून पक्षवाढीसाठी जोरदार प्रयत्न सुरू असून विविध ठिकाणी पक्षप्रवेशाचे सोहळे आयोजित केले जात आहेत. त्याचबरोबर ग्रामपंचायतींवर वर्चस्व कोणाचे ? याबाबत आरोप- प्रत्यारोप रंगत आहेत. त्यामुळे एकेकाळी मित्रपक्ष असलेल्या भाजप व शिवसेनेत पक्षवाढीसाठी सध्या जोरदार रस्सीखेच सुरू असल्याचे चित्र सिंधुदुर्ग जिल्ह्यात पहायला मिळत आहे.जिल्ह्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे हे पक्ष आपापल्यापरीने पक्षवाढीसाठी प्रयत्न करीत आहेत. पण, आगामी काळात शिवसेनेला धक्के देत महत्त्वाची सत्तास्थाने ताब्यात घेण्याची भाजपची छुपी यंत्रणा कार्यरत असल्याचे दिसून येत आहे. त्यातूनच पक्षप्रवेश नाट्ये रंगत आहेत.सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या शिवसेनेचे दोन तर भाजपचे एक आमदार कार्यरत आहेत. जिल्ह्यात महत्त्वाचे सत्तास्थान असलेली जिल्हा परिषद भाजपच्या ताब्यात आहे. त्याचबरोबर महत्त्वाच्या तालुक्यातील पंचायत समितीवरही भाजपने आपला झेंडा रोवला आहे. जिल्ह्यातील बहुतांशी ग्रामपंचायतीही भाजपच्या ताब्यात आहेत. त्या आपल्या ताब्यात याव्यात यासाठी शिवसेना प्रयत्न करीत आहे.भाजपाचे खासदार नारायण राणे, जिल्हाध्यक्ष राजन तेली, आमदार नीतेश राणे, माजी खासदार निलेश राणे, माजी आमदार प्रमोद जठार, माजी जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर, माजी आमदार ॲड. अजित गोगटे यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात भाजपने वाटचाल सुरू ठेवली आहे. त्यात आता माजी केंद्रीय मंत्री खासदार सुरेश प्रभू यांची साथ त्यांना लाभत आहे.खासदार विनायक राऊत, माजी मंत्री दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक, पालकमंत्री उदय सामंत, जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, संदेश पारकर, अतुल रावराणे, संजय पडते असे नेते शिवसेना वाढीसाठी कार्यरत आहेत. त्यामुळे या दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप रंगत असतात.इतर पक्षांचे कार्यकर्ते नाराजराज्यात महाविकास आघाडीची सत्ता असून राज्यस्तरावर शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अंतर्गत नाराजी कधी प्रत्यक्ष तर कधी छुपी दिसून येत आहे. त्याचा परिणामही जिल्हास्तरावर होत असून शिवसेनेकडून महाविकास आघाडीतील इतर पक्षांना आवश्यक तेवढे महत्त्व दिले जात नसल्याने इतर पक्षांचे कार्यकर्ते नाराज आहेत.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूकBJPभाजपाShiv Senaशिवसेनाsindhudurgसिंधुदुर्ग