शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

कंगनाचा निषेध ठराव भाजपने फेटळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2021 17:56 IST

सावंतवाडी : देशाच्या स्वातंत्र्यावर आक्षेपार्ह विधान करणाऱ्या अभिनेत्री कंगना राणावत हिच्या निषेधाच्या ठरावावरून सावंतवाडी नगरपालिका बैठकीत सत्ताधारी व विरोधकात ...

सावंतवाडी : देशाच्या स्वातंत्र्यावर आक्षेपार्ह विधान करणाऱ्या अभिनेत्री कंगना राणावत हिच्या निषेधाच्या ठरावावरून सावंतवाडी नगरपालिका बैठकीत सत्ताधारी व विरोधकात चांगलीच तू-तू..मै-मै झाली. अखेर शिवसेना गटनेत्यांनी मांडलेल्या या ठरावाला भाजपने विरोध केला. न्यायालयाकडून यासंदर्भात टिप्पणी करून तिला दोषी ठरवले जात नाही तोपर्यंत असा ठराव घेता येत नाही असे स्पष्टीकरण नगराध्यक्ष संजू परब यांनी दिले.नगराध्यक्ष संजू परब यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी नगरपालिकेची खास सभा येथील लोकमान्य सभागृहात टिळक सभागृहात पार पडली. यावेळी उपनगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगावकर, ज्येष्ठ नगरसेविका अनारोजीन लोबो, नगरसेवक मनोज नाईक, आनंद नेवगी, नासिर शेख, सुरेंद्र बांदेकर, सुधीर आडिवरेकर, माधुरी वाडकर, दिपाली भालेकर, उत्कर्षा सासोलकर आदी उपस्थित होते.माजी सैनिकांना देण्यात येणाऱ्या भूखंडावर जुन्या आरक्षणात बदल करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी काही सुचना केल्या आहेत असे नगराध्यक्ष यांनी सभागृहात सांगितले. पण यावर नगरसेविका लोंबो यांनी आक्षेप घेतला. आतापर्यंत तीन वेळा सभागृहात हा ठराव आला. त्यात वेळोवेळी बदल करण्यात येतो हे सभागृहास शोभादेणारे नसून आपल्या प्रशासनाकडून योग्य तो ठराव करूनच तो सभागृहा समोर आला पाहिजे असे मत लोंबो यांनी व्यक्त केले.तर बाप्पा नार्वेकर व्यापारी संपादनातील बंद असलेला गाळा क्रमांक दहा भाडेपट्ट्याने मिळण्याबाबत रतन भोसले यांनी केलेल्या अर्जावर चर्चा करण्यात आली. संबंधित  गाळा भाड्याने देताना योग्य ती चौकशी करून भाडेपट्टी आकारण्यात यावी असे उपनगराध्यक्ष अन्नपूर्णा कोरगावकर यांनी स्पष्ट केले.अभिनेत्री कंगना राणावत हिच्या निषेध ठरावावर सत्ताधारी नगरसेवकांनी लोंबो यांना कोंडीत पकडले.  सत्ताधारी आणि विरोधी नगरसेवकांमध्ये या विषयावरून तू-तू.. मै-मै झाले पण नंतर त्यात नगराध्यक्ष परब यांनी हस्तक्षेप करत वादावर पडदा पाडला.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गKangana Ranautकंगना राणौतBJPभाजपा