शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

..अखेर भाजप-मनसेचे सुत जुळले, कुडाळात युतीचा नवा पॅटर्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2022 16:42 IST

कुडाळ नगरपंचायतीच्या उर्वरित चार जागांसाठी १८ जानेवारीला निवडणूक होत असून या निवडणुकीत भाजपला तीन जागांवर मनसेने जाहीर पाठिंबा दिला

कुडाळ : कुडाळ नगरपंचायतीच्या उर्वरित चार जागांसाठी १८ जानेवारीला निवडणूक होत असून या निवडणुकीत भाजपला तीन जागांवर मनसेने जाहीर पाठिंबा दिला असून, प्रभाग क्र. १६ एमआयडीसी येथे मनसेचे उमेदवार सहदेव पावसकर यांना भाजपने जाहीर पाठिंबा दिला आहे. या स्थानिक पातळीवरील युतीची घोषणा जिल्हा परिषद भाजप गटनेते रणजित देसाई व मनसे तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांनी कुडाळ भाजप कार्यालयात घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत जाहीर केली.यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष विनायक राणे, भाजप महिला जिल्हाध्यक्ष संध्या तेरसे, भाजप शहराध्यक्ष राकेश कांदे, आनंद शिरवलकर, प्रशांत राणे, मनसे पिंगुळी ग्रामपंचायत सदस्य बाबल गावडे, दीपक गावडे, उमेदवार सहदेव पावसकर तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी रणजित देसाई यांनी सांगितले की, प्रभाग १६ मधील भाजप उमेदवार सुधीर चव्हाण यांच्या निधनानंतर या ठिकाणी होणाऱ्या निवडणूक प्रक्रियेबाबत निवडणूक निर्णय अधिकारी यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे मार्गदर्शन मागितले होते. त्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने या ठिकाणी जे उमेदवार आहेत त्यांच्यात निवडणूक घ्यावी असे सांगितले. त्यामुळे आता या ठिकाणी शिवसेना व मनसे या पक्षाचे उमेदवार आहेत. भाजपचा उमेदवार नाही.त्यामुळे या प्रभागातील मनसेचे उमेदवार सहदेव पावसकर यांना भाजप जाहीर पांठिबा देत असून त्यांच्या प्रचारात भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते सक्रिय राहतील. तसेच इतर तीन भाजप उमेदवारांच्या प्रचारात मनसे सक्रिय राहणार आहे.युतीला नक्की यश मिळेल : देसाईयापूर्वी पिंगुळी ग्रामपंचायत निवडणुकीत मनसे, स्वाभिमान युती करीत सत्ता आणली होती. तसेच पिंगुळी येथील पोटनिवडणुकीत ही मनसेची साथ भाजपला मिळाली व त्यावेळी आमचा विजय झाला होता. त्यामुळे या स्थानिक पातळीवरील भाजप, मनसे युतीला नक्कीच यश मिळणार व चारही उमेदवार आमचे विजयी होतील असा विश्वास देसाई यांनी व्यक्त केला.निकालानंतर मनसे भाजपाच्या गटात : प्रसाद गावडेयावेळी प्रसाद गावडे यांनी सांगितले की, मनसेचे उमेदवार पावसकर यांना भाजपाने जाहीर पाठिंबा दिला असल्याने भाजप ,मनसे युतीचे नवीन समीकरण युती निर्माण झाली आहे. मनसेही भाजपा उमेदवारांच्या प्रचारात सक्रिय होणार आहे. निवडणुकीच्या निकालानंतर भाजप जो गट स्थापन करणार त्यात मनसे बांधील राहील असेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गkudal-acकुडाळBJPभाजपाMNSमनसेElectionनिवडणूक