शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

जिथे वाद नाही तिथे ग्रीन रिफायनरी प्रकल्प; नितेश राणेंची शिवसेनेवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2022 21:34 IST

पर्यावरणमंत्री आदित्‍य ठाकरे यांनी देवगडात शिवसेनेचा आवाज वाढला असल्‍याचे वक्तव्य केले होते.  पण वाढलेला हा आवाज मांजरीचा की वाघाचा असा टोला त्यांनी आज लगावला.

कणकवली :  ग्रीन रिफायनरी प्रकल्पाला  नाणार गाव वगळता इतर गावातून पाठींबा आहे. त्‍यामुळे नाणार वगळून लवकरच ग्रीन रिफायनरी प्रकल्‍प होणार आहे. शिवसेना पक्षानेही याबाबत सकारात्मक भूमिका घेतली आहे. त्‍यामुळे आता खासदार विनायक राऊत हे रिफायनरीचे एकमेव विरोधक उरले आहेत. पण त्‍यांना त्यांच्या पक्षात काडीची किंमत  नाही अशी टीका आमदार नीतेश राणे यांनी केली.

कणकवली येथे बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्‍हणाले, ग्रीन रिफायनरी प्रकल्‍पाला जनतेमधून उत्‍स्‍फुर्त पाठींबा आणि समर्थन मिळत आहे. त्‍यामुळे शिवसेनेला या प्रकल्‍पाला मान्यता देण्याशिवाय आता कोणताही पर्याय राहिलेला नाही. तसेच कुठलाही प्रकल्‍प आला की त्‍याला विरोध करायचा आणि  जनतेची माथी भडकवायची. तसेच काही दिवसांनी त्या प्रकल्पाला समर्थन द्यायचे .असे काम शिवसेनेची मंडळी करत आहेत.

बारसू या भागात रिफायनरी प्रकल्‍प होणार आहे. शिवसेनेने तेथील जागेला पाठींबा दिला असून मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना पत्र लिहिले आहे.  त्‍यामुळे त्‍या गावातील जमिनीच्या  सातबारावर कुणाची  नावे आहेत हे पहावे लागेल. तसेच ग्रीन रिफायनरी प्रकल्प होणार,पण कुठल्या जागेत होणार हे केंद्र सरकार ठरवणार आहे. यासाठी माजी आमदार प्रमोद जठार यांच्या नेतृत्वाखाली आम्ही केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासह दिल्लीत इतर मंत्र्यांची भेट घेणार आहोत.असे नितेश राणे यावेळी  म्‍हणाले.

ते पुढे म्हणाले, पर्यावरणमंत्री आदित्‍य ठाकरे यांनी देवगडात शिवसेनेचा आवाज वाढला असल्‍याचे वक्तव्य केले होते.  पण वाढलेला हा आवाज मांजरीचा की वाघाचा असा टोला त्यांनी आज लगावला. तसेच नुसते दौरे करून काहीही उपयोग नाही, तुम्‍ही जिल्‍हावासीयांसाठी किती निधी आणला. पर्यटन व्यावसायिकांसाठी काय पॅकेज तयार केले याची माहिती त्यांनी द्यायला हवी. काहींनी ओरिजनल टायगर म्हणून देवगड मध्ये बॅनर्स लावले. शिवसेना कुठे जिंकली? त्यांच्याकडून जिल्हा बँक गेली. कुडाळ, देवगड या दोन ठिकाणी दुसऱ्या लोकांच्या पाठींबा घेऊन नगरपंचायतीत सत्ता आहे. मला बाहेर ठेवून विरोधकांना जिंकणे शक्य आहे. मात्र, हिम्मत असेल तर मी निवडणुकीच्या रणांगणात असताना त्यांनी विजय मिळवावा. देवगडची सत्ता बदलणे माझ्यासाठी सोपे आहे.माझ्या संपर्कात तेथील अनेक लोक आहेत.त्यामुळे पुढील काळात पाहू कसे करता येईल ते ,असा इशाराही शिवसेनेला आमदार नितेश राणे यांनी यावेळी दिला.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाNitesh Raneनीतेश राणे Aaditya Thackerayआदित्य ठाकरे