शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

..तर संजय राऊतांना का मिर्ची झोंबते? नितेश राणेंचा सवाल 

By सुधीर राणे | Updated: September 27, 2023 13:54 IST

मात्र, त्यावेळी आदित्य ठाकरे परदेश दौरा करत होते

कणकवली: काँग्रेसवर टीका केली की संजय राऊत यांना मिर्ची झोंबते. त्याचे नेमके काय कारण आहे? आदित्य ठाकरे यांच्या ट्विटमुळे साधी माशीसुद्धा मरत नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील दुष्काळी स्थिती बघून आपला विदेश दौरा रद्द केला. मात्र, जेव्हा उद्धव ठाकरे शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात होते त्यावेळी आदित्य ठाकरे परदेश दौरा करत होते. याबाबत संजय राऊत यांनी आधी बोलावे असा टोला भाजप आमदार नितेश राणे यांनी लगावला. कणकवली येथे बुधवारी आमदार नितेश राणे यांनी प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, वडील गंभीर आजारी असताना आपण स्वतः मुख्यमंत्री कसे होऊ शकतो याचा प्रस्ताव आपल्या आईच्या माध्यमातून 'मविआ' कडे आदित्य ठाकरे देत होते.  बाळासाहेब ठाकरेंची १७ नोव्हेंबर रोजी पुण्यतिथी असतानाही आदित्य ठाकरे परदेश दौऱ्यात व्यस्त होते. ते समाधी स्थळी आले नाहीत. याला नेमके काय म्हणावे? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.येत्या हिवाळी अधिवेशनाआधी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार राज्यातील महायुती शासनात मंत्री होण्याची शक्यता आहे. त्यामुळे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपात फूट पडण्याची स्वप्ने पाहू नयेत. महिला आरक्षणाचा त्रास सर्वात जास्त संजय राऊत यांना होणार आहे. कारण त्यांची वर्तणूक ठीक नाही. असा आरोपही नितेश राणे यांनी यावेळी केला.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गNitesh Raneनीतेश राणे Sanjay Rautसंजय राऊतcongressकाँग्रेस