भाजप लोकदरबार ; विविध समस्यांवर चर्चा

By Admin | Updated: November 20, 2014 00:02 IST2014-11-19T21:41:57+5:302014-11-20T00:02:04+5:30

तालुक्यातील उद्योग, आरोग्य, रस्ते, वीज, आरोग्य, रेल्वे, एसटी वाहतूक या विविध प्रश्नांवर चर्चा

BJP Lokarbar; Discussion on various issues | भाजप लोकदरबार ; विविध समस्यांवर चर्चा

भाजप लोकदरबार ; विविध समस्यांवर चर्चा

कुडाळ : तालुका भाजपाचा लोकदरबार नुकताच कुडाळ येथे घेण्यात आला. यावेळी तालुक्यातील उद्योग, आरोग्य, रस्ते, वीज, आरोग्य, रेल्वे, एसटी वाहतूक या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. येथील हॉटेल यशधाराच्या सभागृहात झालेल्या या बैठकीस जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर, माजी आमदार प्रमोद जठार, माजी आमदार राजन तेली, तालुकाध्यक्ष बब्रुवान भगत, राजू राऊळ, काका कुडाळकर, जिल्हा सरचिटणीस चारुदत्त देसाई, नीलेश तेंडुलकर, राजश्री धुमाळे, जयदेव कदम आदी उपस्थित होते. लोकदरबारचे प्रास्ताविक चारूदत्त देसाई यांनी केले. सुरुवातीला मुखेड (जि. नांदेड) येथील आमदार गोविंद राठोड यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षणमंत्री विनोद तावडे, सहकार व सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील, रेल्वेमंत्री सुरेश प्रभू, गोव्याचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, केंद्रीय संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर व अन्य आमदार व लोकप्रतिनिधींच्या अभिनंदनाचा ठराव राज्य परिषद सदस्य नीलेश तेंडुलकर यांनी मांडला. त्याला सर्वांनी अनुमोदन दिले. माजी आमदार प्रमोद यांनी लोकदरबाराची संकल्पना उपस्थितांसमोर मांडली व त्याप्रमाणे कुडाळ तालुक्यातील रस्ते, वीज, आरोग्य, रेल्वे, एसटी वाहतूक या प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. सुधा शारबिदे्र यांनी कुडाळ शहरातील सुलभ शौचालय कोठे गायब झाली याची चौकशी करावी, अशी मागणी केली. तालुकाध्यक्ष बब्रुवान भगत यांनी उद्योग, आरोग्य, सिंचन, रेल्वे, शहरातील समस्या, जमीन महसूल कायदा, नेरूर तलाव सुशोभिकरण, नेरूर येथे बीएसएनएल टॉवर आदी समस्यांबाबत ऊहापोह केला. या लोकदरबारात निरूखे, तेंडोली, गोवेरी, नेरूर, आंदुर्ले, माणगाव, कसाल, भोईचे केरवडे, पिंगुळी ग्रामपंचायत येथील समस्यांची निवेदने स्वीकारण्यात आली. आंदुर्ले येथील दिलीप सर्वेकर या अपंगाला गेली तीन वर्षे शासकीय कारभारामुळे झालेल्या त्रासाबाबतच्या निवेदनावर चर्चा करण्यात आली व त्यांना योग्य न्याय देण्यात येईल, असे अतुल काळसेकर यांनी सांगितले. या लोकदरबाराला स्वाती तेंडोलकर, दक्षता मेस्त्री, गजानन वेंगुर्लेकर, विजय कांबळी, गुरू पाटील, प्रमोद राऊळ, जगदीश उगवेकर, सुहास पारकर, आनंद रेडकर, लक्ष्मी आरोंदेकर, सुंदर मेस्त्री, का. स. नाईक, प्रताप राऊळ, मोहन जाधव उपस्थित होते. (प्रतिनिधी)


कुडाळ भाजपाच्यावतीने आयोजित लोकदरबार कार्यक्रमात प्रमोद जठार यांनी मार्गदर्शन केले. यावेळी अतुल काळसेकर, राजन तेली, बब्रुवान भगत, राजू राऊळ, काका कुडाळकर आदी उपस्थित होते.

Web Title: BJP Lokarbar; Discussion on various issues

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.