शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्गात अवैध धंद्यांविरोधात भाजप नेत्यांचाच एल्गार; पोलीसांना आठ दिवसांची मुदत 

By अनंत खं.जाधव | Updated: October 10, 2022 23:44 IST

परब म्हणाले, पोलिसांचे दुर्लक्ष असल्यामुळे सावंतवाडीत अवैध धंदे करणार्‍यांची दहशत सुरू आहे. येत्या आठ दिवसात ती दहशत आणि गैरप्रकार पोलिसांनी मोडीत काढावेत अन्यथा दहा हजार सह्याची मोहीम राबवून पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्याकडे तक्रार करू.

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध धंद्यां विरोधात भाजपच्या नेत्यांनी एल्गार पुकारला असून, जो पर्यंत अवैध धंदे बंद होत नाही, तोपर्यंत शांत बसणार नाही, अशी घोषणाच सिंधुदुर्ग भाजप नेते संजू परब यांनी पत्रकार परिषदेत दिली. यामुळे भाजप पुढे अडचण निर्माण झाली आहे. विशेषता भाजपला प्रथमच सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री पद मिळाल्याने आता त्यांच्या पुढे अवैध धंदे बंद करण्याचे आवाहन उभे ठाकले आहे.

परब म्हणाले, पोलिसांचे दुर्लक्ष असल्यामुळे सावंतवाडीत अवैध धंदे करणार्‍यांची दहशत सुरू आहे. येत्या आठ दिवसात ती दहशत आणि गैरप्रकार पोलिसांनी मोडीत काढावेत अन्यथा दहा हजार सह्याची मोहीम राबवून पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्याकडे तक्रार करू. शहरात राजरोस नाक्यानाक्यांवर सुरू असलेले गैरप्रकार शांत आणि सुसंस्कृत शहराला भूषणावह नाही. त्यामुळे याबाबत आम्ही भविष्यात आक्रमक भूमिका घेणार असून अवैध धंदे आणि त्यांना पाठीशी घालणार्‍यांचे प्रकार खपवून घेणार नाही. सावंतवाडी शहर बदनाम होत आहे त्यातून अनेकांचे  संसार उद्ध्वस्त होत आहेत, असे सांगत परब यांनी अवैध धंद्यांविरोधात नाराजी व्यक्त केली. लवकरच या विरोधात उपविभागीय पोलिस अधिकारी रोहिणी सोंळके यांनी धडक कारवाई करत सावंतवाडीत सुरू असलेले  अवैध धंदे उद्ध्वस्त करावेत यात दारू, जुगार, मटका यांच्यासह अमंली पदार्थ  विक्री करणार्‍यांची संख्या जास्त आहे. यावरच हा प्रकार थांबला नाही. तर शहरात वेश्या व्यवसाय ही वाढत आहेत पण पोलिस कोणतीही कारवाई करत नाही. असेही परब म्हणाले.

अवैध व्यावसायिकांकडून शहरात दहशत सुरू आहे. त्यामुळे हे प्रकार रोखण्याची मागणी भाजपकडून करण्यात येत आहे. याबाबत पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांचे लक्ष वेधण्यात येणार आहे. तसेच येत्या आठ दिवसात याबाबत योग्य ती कारवाई झाली नाही, तर दहा हजार सह्यांची मोहीम राबविली जाणार आहे.असेही परब यांनी सांगितले.

पोलीस हप्ते घेण्यासाठी येतात - सावंतवाडीत अधिकृत असलेल्या काही परमिट रूममध्ये पोलीस हप्ते घेण्यासाठी येतात याबाबत ही आम्ही लवकरच पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार करणार असून हे कोण पोलीस आहेत त्याची नावे ही देणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले 

टॅग्स :BJPभाजपाsindhudurgसिंधुदुर्गPoliceपोलिस