शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
3
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
4
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
5
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
6
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
7
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
8
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
9
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
10
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
11
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
12
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
13
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
14
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
15
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
16
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
17
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
18
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
19
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
20
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू

विद्यमान आमदार म्हणून भाजप उमेदवारी देत नाही, राजन तेलींचा नितेश राणेंना अप्रत्यक्ष टोला

By अनंत खं.जाधव | Updated: March 14, 2023 16:04 IST

देशातील अनेक विद्यमान आमदारांना भाजपने उमेदवारी नाकारली

सावंतवाडी : विधानसभेला कोणाला उमेदवारी द्यायची याचा निर्णय केंद्रीय पातळीवर होत असतो. देशातील अनेक विद्यमान आमदारांना पक्षाने उमेदवारी नाकारली आहे. भाजप पक्ष ज्यांना समजतो ते जाहीर वक्तव्य करणार नाहीत असा टोला भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी आमदार नितेश राणे यांचे नाव न घेता लगावला. तर मंत्री दीपक केसरकर यांना भाजपवर बोलण्याचा अधिकार नाही. ते शिंदे गटात गेले त्यावेळी त्यांच्या सोबत कोण गेले हे शोधावे लागतील अशी टिकाही केसरकरांवर केली.सावंतवाडीतील भाजप कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हा बँक संचालक महेश सारंग, रविंद्र मडगावकर, माजी नगरसेवक उदय नाईक, सुधीर आडीवरेकर, परिमल नाईक, आनंद नेवगी, महेश धुरी, हळदणकर, बाळू शिरसाट आदी उपस्थित होते.यावेळी बोलताना तेली यांनी मंत्री केसरकर यांच्यावर सडकून टीका केली. मला विधान परिषद देणारे तुम्ही कोण उलट येथील जनतेने नाकारले तर मलाच तुमची शिफारस करावी लागेल. तुम्ही फक्त घोषणा करता मागील काळात मल्टिस्पेशालिटी रूग्णालय तसेच काथ्या उद्योग, चष्मा कारखाना, सेटटॉप बॉक्स या सर्वाचे काय झाले, किती रोजगार आणले. फक्त विकासाच्या घोषणा करायच्या आणि प्रत्यक्षात काही करायचे नाही. आणि आम्ही काय करत असेल त्यात आडकाठी करायचे हे किती दिवस चालणार असा सवाल ही तेली यांनी केला.तुम्ही विकास केला रोजगार आणला असे म्हणता मग शिवसेनेतून शिंदे गटात गेला त्यावेळी तुमच्या सोबत कोण आले ते जाहीर करा. अन्यथा आम्हाला नाइलाजास्तव तोड उघडावे लागेल आणि तुमचा अहवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना द्यावा लागेल असा इशारा ही त्यांनी यावेळी दिला. रोज उठून खोटे बोलायचे जनतेची फसवणूक करायची हे आम्हाला जमत नाही. गेल्या पंचवीस वर्षांत सावंतवाडीतील जनतेशी समरस होऊन काम करतो तुमच्या सारखे मला विमानाला जायचे म्हणून नेहमी लोकांची दिशाभूल करत नाही अशी टीका ही केली.तर, आमदार नितेश राणे यांनाही अप्रत्यक्ष टोला लगावला. जे विद्यमान आमदार म्हणतात निवडणूक पूर्वी निवडून आणण्याचे सांगत आहेत हे भाजप पक्षात चालत नाही. देशात अनेक वरिष्ठ नेत्यांच्या उमेदवारी आयत्यावेळी रद्द केल्या आहेत त्यामुळे सिटिग उमेदवार वैगरे भाजपत चालत नाही असा सल्लाही यावेळी दिला.केसरकर यांची जंत्री काढण्याचे काम सुरूजिथे जायचे त्याचे गोडवे गायचे आणि इतराना शिव्या द्यायच्या हाच कार्यक्रम मंत्री दीपक केसरकर यांचा असून मागील आठ वर्षात कोणाला कशा प्रकारे शिव्या घातल्या यांची जंत्री काढून भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाकडे देण्यात येणार आहे असे तेली यांनी सांगितले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गBJPभाजपाNitesh Raneनीतेश राणे Rajan Teliराजन तेली